Home मनोरंजन आंतरराष्ट्रीय पुरुष दिन: कलाकारांनी ताकद आणि पुरुषत्वाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मांडला

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन: कलाकारांनी ताकद आणि पुरुषत्वाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मांडला

0 second read
0
0
11

no images were found

आंतरराष्ट्रीय पुरुष दिन: कलाकारांनी ताकद आणि पुरुषत्वाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मांडला

ताकद म्हणजे कठोर असणं, सर्वकाही नियंत्रणात ठेवणं आणि भावना व्यक्त न करणं, अशी धारणा अनेकदा केली जाते. मात्र, कधी कधी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी, गरज असताना मदत मागण्यासाठी आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांसमोर मन मोकळं करण्यासाठी अधिक धैर्य लागतं. यंदाच्या आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त, सोनी सबचे कलाकार अधिक मेहता, मनीष वाधवा आणि मुकुल हरीश यांनी ताकद आणि पुरुषत्वाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलला आहे, याबद्दल सांगितले. त्यांनी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील अनुभवांमधून तसेच त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून या संकल्पनांकडे नव्या दृष्टीने कसं पाहायला शिकलो, हे शेअर केलं.

लो चुडैल चली ससुरालमध्ये आरवची भूमिका साकारणारे अधिक मेहता म्हणाले, “माझ्यासाठी खरी ताकद ही आपल्या आवडत्या माणसांशी आपण कसं वागतो यात असते, विशेषतः जेव्हा आयुष्य आपल्या वाट्याला अनपेक्षित आव्हानं आणतं. माझं पात्र आरवच्या आयुष्यात मोठं वळण येतं, जेव्हा त्याला कळतं की त्याची पत्नी उर्वशीकडे जादुई शक्ती आहेत. पण तरीही तो तिच्या पाठीशी प्रेमाने आणि समजूतदारपणे उभा राहतो. कितीही गोंधळ निर्माण झाला तरी तो तिची साथ देणं आणि प्रत्येक परिस्थितीला एकत्र सामोरं जाणं निवडतो. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त, माझ्या मते अशा पुरुषांचा सन्मान करणं महत्त्वाचं आहे जे दयाळूपणा, संयम आणि संवेदनशीलतेने नेतृत्व करतात. भावनिकदृष्ट्या उपस्थित राहणं, ऐकून घेणं आणि आपल्या प्रिय व्यक्तींच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं हीदेखील अशी ताकद आहे, जी साजरी केली जाणं आवश्यक आहे.”

हस्तिनापूर के वीरमध्ये भीष्म पितामहांची भूमिका साकारणारे मनीष वाधवा म्हणाले, “वडील झाल्यानंतर मला हे शिकायला मिळालं की खरी ताकद ही नेहमी कठोर असण्यात किंवा शेवटचं मत स्वतःचंच असण्यात नसून, समजून घेण्यात आणि सहजपणे संवाद साधता येण्यात असते. मुलांना अनेकदा आपली गरज असते ती त्यांचं ऐकून घेण्यासाठी, त्यांचा दृष्टिकोन समजून घेण्यासाठी आणि त्यांना स्वतःला व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य देण्यासाठी. हस्तिनापूर के वीरच्या सेटवर बालकलाकारांसोबत काम करतानाही मला ही गोष्ट जाणवते. ते उत्सुकता आणि नवीन कल्पनांनी भरलेले असतात आणि मोठ्यांच्या नात्याने त्यांना मार्गदर्शन करणं, त्यांच्या वेगळेपणाला प्रोत्साहन देणं आणि आत्मविश्वासाने वाढण्यास मदत करणं ही आपली भूमिका आहे, असं मला वाटतं. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त, मुलांच्या आयुष्यात सकारात्मक प्रभाव निर्माण करणं हीच ताकद दाखवण्याची सर्वात अर्थपूर्ण पद्धत आहे, हे ओळखणाऱ्या पुरुषांचा गौरव करणं महत्त्वाचं आहे.”

पुष्पा इम्पॉसिबलमध्ये टायगरची भूमिका साकारणारे मुकुल हरीश म्हणाले, “माझं पात्र टायगर असं आहे की ज्याने नेहमी स्वतःला खंबीर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे आणि आपल्या भावना स्वतःपुरत्याच मर्यादित ठेवल्या आहेत. आयुष्यात अनेक आव्हानांना सामोरं गेल्यानंतर तो हळूहळू मन मोकळं करणं आणि त्याला खरंच काय वाटतं हे व्यक्त करणं शिकत आहे. मला वाटतं ही अशी गोष्ट आहे ज्याच्याशी अनेक पुरुष स्वतःला जोडू शकतात, आणि त्यात मीही आहे. मला नेहमी असं वाटत आलं आहे की आपल्या भावना व्यक्त करणं, मग त्या आनंदाच्या असोत, दुःखाच्या असोत किंवा प्रेमाच्या, हे कमजोरीचं नव्हे तर ताकदीचं लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय पुरुष दिनानिमित्त, मला आशा आहे की अधिकाधिक पुरुषांना त्यांच्या भावना स्वीकारण्यासाठी, मोकळेपणाने संवाद साधण्यासाठी आणि संवेदनशील असणंदेखील खंबीर असण्याचाच एक भाग आहे हे समजून घेण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.”

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयांना १२६. कोटी ३३ लाख रुपयांचे वितरण

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयांना १२६. कोटी ३३ लाख रुपयांचे वितरण : ऑक्टोबर महि…