Home मनोरंजन “माझ्या चाहत्यांनी त्यांच्या शुभेच्छांमध्ये दाखवलेली मेहनत आणि सर्जनशीलता पाहून मी भारावून गेले आहे,” : हिबा नवाब 

“माझ्या चाहत्यांनी त्यांच्या शुभेच्छांमध्ये दाखवलेली मेहनत आणि सर्जनशीलता पाहून मी भारावून गेले आहे,” : हिबा नवाब 

7 second read
0
0
12

no images were found

“माझ्या चाहत्यांनी त्यांच्या शुभेच्छांमध्ये दाखवलेली मेहनत आणि सर्जनशीलता पाहून मी भारावून गेले आहे,” : हिबा नवाब 

   वाढदिवस तेव्हा आणखी खास बनतो, जेव्हा चाहत्यांचे प्रेम आणि आपुलकी कलाकाराच्या खऱ्या आयुष्यातील सेलिब्रेशनचा भाग बनते. हिबा नवाबसाठी यंदाचा वाढदिवस संस्मरणीय ठरला, कारण तिच्या चाहत्यांनी सोनी सबच्या आगामी लो चुडैल चली ससुराल या मालिकेच्या सेटवर तिला खास सरप्राईज देण्यासाठी विशेष प्रयत्न केले. 18 नोव्हेंबरपासून, दर सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता प्रसारित होणाऱ्या या मालिकेच्या प्रीमियरपूर्वी, विचारपूर्वक केलेले उपक्रम आणि वाढदिवसानिमित्त दिलेली खास सरप्राईज यामुळे हा दिवस आनंद आणि आपुलकीने भरून गेला. चाहत्यांकडून मिळालेल्या प्रेमामुळे हिबा सुखद भावूक झाली.

      यंदाच्या सेलिब्रेशनला आणखी एक खास कारण लाभलं आहे, कारण हिबा उर्वशी या मजेशीर आणि हटके चुडैलची भूमिका साकारत एका नव्या प्रवासासाठी सज्ज झाली आहे. मालिकेच्या प्रीमियरच्या अवघ्या चार दिवस आधी तिचा वाढदिवस आल्यामुळे, तिच्या चाहत्यांकडे दुहेरी आनंद साजरा करण्याचं कारण आहे. त्यांच्या आवडत्या अभिनेत्रीच्या या नव्या प्रवासासाठी शुभेच्छा देण्याबरोबरच तिचा वाढदिवसही ते उत्साहात साजरा करत आहेत.

     आपल्या वाढदिवसाबद्दल आणि चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमाबद्दल बोलताना हिबा नवाब म्हणाल्या, “वाढदिवस नेहमीच खास असतात, पण ते आणखी संस्मरणीय बनतात ते मला माझ्या चाहत्यांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे. त्यांनी पाठवलेले संदेश, एडिट्स, कलाकृती आणि माझ्यासाठी केलेली छोटी-छोटी सरप्राईज खरोखरच मला खूप प्रेम मिळाल्याची जाणीव करून देतात. त्यांच्या शुभेच्छांमध्ये त्यांनी दाखवलेली मेहनत आणि सर्जनशीलता पाहून मी भारावून गेले आहे. शक्य तितक्या शुभेच्छा आणि भेटवस्तू पाहण्याचा मी प्रयत्न केला. यंदाचं वर्ष आणखी रोमांचक आहे, कारण लो चुडैल चली ससुराल प्रसारित होण्याच्या अवघ्या काही दिवस आधीच मी माझा वाढदिवस साजरा करत आहे!”

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In मनोरंजन
Comments are closed.

Check Also

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयांना १२६. कोटी ३३ लाख रुपयांचे वितरण

महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून रुग्णालयांना १२६. कोटी ३३ लाख रुपयांचे वितरण : ऑक्टोबर महि…