
no images were found
पाकिस्तानात मोठी दुर्घटना; लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले
दोन मेजरसह सहा जवान ठार
पाकिस्तानमधील बलुचिस्तानमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून मोठा अपघात झाला आहे. या दुर्घटनेत लष्कराचे २ मेजर व ६ जवान यांचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना काल रात्री उशिरा हरनाई जिल्ह्यातील खोस्त शहराजवळ घडल्याचे वृत्त आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन पायलटदेखील होते. ज्यांचे प्राण वाचवण्यात यश आल्याचे समोर आले आहे.
मेजर खुर्रम शहजाद (वय 39) आणि मेजर मोहम्मद मुनीब अफजल (वय 30), सुभेदार अब्दुल वाहिद (वय 44), हवालदार मुहम्मद इम्रान खान (वय 27), नाईक जलील (वय 30) आणि 35 वर्षीय हवालदार शोएब यांचा मृतांमध्ये समावेश आहे.