Home क्राईम अभिनेत्री जॅकलिनला जामीन मंजूर

अभिनेत्री जॅकलिनला जामीन मंजूर

0 second read
0
0
120

no images were found

अभिनेत्री जॅकलिनला जामीन मंजूर

सुकेश चंद्रशेखर मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसला विरुद्ध आरोपपत्र सादर केल्यानंतर तिला आज न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.  मनी लाँड्रिंग प्रकरणात पतियाळा हाऊस कोर्टाने जॅकलीनला 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ईडीने एका निवेदनात असे नमूद केले आहे की, ‘सुकेश चंद्रशेखरने खंडणीसह गुन्हेगारी कृत्यांमधून जॅकलीन फर्नांडिसला ५.७१ कोटींच्या विविध भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखर बराच काळ तिचा साथीदार होता. सुकेशने सहआरोपी पिंकीच्या माध्यमातून जॅकलीनला या भेटवस्तू दिल्या होत्या. चंद्रशेखरने फर्नांडिसला भेटवस्तू देण्यासाठी बेकायदेशीर पैशांचा वापर केला, असा आरोपही ईडीने केला आहे.

ईडीकडून आतापर्यंत चंद्रशेखर, पत्नी लीना मारिया पॉल आणि पिंकी इराणी आदींसह आठजणांना अटक करून दिल्ली न्यायालयात दोन आरोपपत्रे देखील दाखल करण्यात आलेली आहेत.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्‌घाटन

जन आरोग्य योजना अधिक पारदर्शक व प्रभावी करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस:न्यू एरा मल्टी …