
no images were found
प्रधानमंत्री मुद्रा योजनेवर शिवाजी विद्यापीठात कार्यशाळा
कोल्हापूर (प्रतिनिधी): यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ डेव्हलपमेंट, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर यांच्या वतीने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन केले आहे. ‘प्रधानमंत्री मुद्रा योजनेचे प्रभाव मूल्यांकन: पश्चिम महाराष्ट्रातील अंतर्दृष्टी या विषयावर कार्यशाळा आज दिनांक २० फेब्रुवारी रोजी संपन्न होणार आहे. ही कार्यशाळा सेमिनार हॉल,
अर्थशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठामध्ये सकाळी १०.३० वाजता सुरू होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यापीठाच्या मानवशास्त्र शाखेचे अधिष्ठाता प्रा. डॉ. एम. एस. देशमुख असणार आहेत.
इंडियन कौन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च यांच्यावतीने “Socio-Economic Impact Assessment of Pradhan Mantri Mudra Yojana with special reference to Western Maharashtra” या विषयावर सहयोगी संशोधन प्रकल्प मंजूर करण्यात आला आहे. डॉ.कविता वड्राळे – प्रकल्प समन्वयक आणि प्रकल्प संचालक- डॉ. संतोष सुतार, डॉ. उमेश गडेकर, डॉ. गजानन साळुंखे आणि श्री. चेतन गलगे यांच्याद्वारे संशोधन प्रकल्पाचे काम करण्यात आले आहे. संशोधन प्रकल्पावर आधारित मुद्रा योजनेवरील संशोधन निष्कर्षांचे विश्लेषण करण्यासाठी या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेमध्ये आरशेती कोल्हापूर चे संचालक श्री. कुलभूषण उपाध्ये, जिल्हा अग्रणी व्यवस्थापक श्री. गणेश गोडसे, प्रा., डॉ. विद्या कट्टी, डॉ. प्रतिमा पवार आणि डॉ. नितीन माळी यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तरी मुद्रा योजनेचे लाभार्थी, शासकीय व निम शासकीय स्थरावरील कर्मचारी, आशा वर्कर, स्वयम् सहायता गट, स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, संशोधक विद्यार्थी, शिक्षक व अभ्यासकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रुरल डेव्हलपमेंटचे प्र- संचालक डॉ. नितीन माळी व प्रकल्प समन्वयक डॉ. कविता वड्राळे यांनी केले आहे.