
no images were found
तेली समाजाचे प्रश्न सोडविण्यास कटिबद्ध : बावनकुळे
औरंगाबाद : ओबीसी आणि तेली समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेलीसमाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. हे औरंगाबाद दौऱ्यावर बावनकुळे आले असताना विविध क्षेत्रातील, समाजातील नेते तसेच पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत त्यांनी संवाद साधला. यावेळी निराला बाजार येथील तेली समाजाचे नेते अनिल मकरिये यांच्या निवासस्थानी ही चर्चा केली. यावेळी ओबीसी समाजाच्या नेत्यांनी बावनकुळे यांचेकडे निवेदन दिले. समाजाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. ओबीसी आणि तेली समाजाचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी पाठपुरावा करून सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेलीसमाजाच्या पदाधिकाऱ्यांना दिले.
कार्यक्रमात तेली समाज कुटुंब परिचय पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. यावेळी प्रदेश तेली महासंघाचे प्रदेशाध्यक्ष विजय चौधरी, अशोक पांगारकर, डॉ.मच्छिंद्र पाखरे, विश्वनाथ गवळी, गणेश पवार, भारत चौधरी, दत्तू हिरे, सुरेश सोनवणे, ॲड.सदानंद देवे, काशिनाथ मिसाळ, गणेश शिंदे उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओबीसी नेत्यांबरोबर मराठा समाजातील विविध पदाधिकाऱ्यांची विनोद पाटील यांच्या निवासस्थानी भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. यात मराठा समाजातर्फे मांडण्यात आलेल्या विविध सूचनाही सरकारपर्यंत पोचविण्यात येणार असल्याचे आश्वासनही बावनकुळे यांनी दिले. यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ.कराड, सहकारमंत्री अतुल सावे उपस्थित होते.