
no images were found
शिक्षक, पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जानेवारी अखेर
30 डिसेंबर रोजी अंतिम यादी जाहीर
विधानपरिषदेतील शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच सदस्यत्वाची मुदत 7 जानेवारी 2023 ला संपत आहे. त्यामुळे या रिक्त जागांसाठी जानेवारी अखेर निवडणूक होईल. शिक्षक आमदार काळे हे संभाजीनगर, बाळाराम पाटील (कोकण) तर गाणार नागपूर पदवीधर आमदार डॉ. पाटील अमरावती, तर डॉ. तांबे हे नाशिक या पाचही आमदारांच्या विधान परिषद सदस्यत्वाची 7 जानेवारी 2023 रोजी मुदत संपत आहे.
या निवडणुकीसाठी मागील मतदार यादी वापरत नाहीत त्यामुळे १ ऑक्टोबर २०२२ रोजी नवीन यादी तयार केली जाणार आहे. २३ नोव्हेंबरला मतदार यादीचा प्रारूप मसुदा जाहीर करून ३० डिसेंबरला अंतिम यादी जाहीर होईल.
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी पदवी प्राप्त होऊन तीन वर्षे पूर्ण तसेच मतदारसंघात नाव असणे आवश्यक आहे. तर शिक्षक मतदारसंघांसाठी निवडणूक लढवणाऱ्या इच्छुक उमेदवाराने मागील सहा वर्षांत किमान तीन वर्षे शिकवलेले असावे, अशी उमेदवारांसाठी अट असल्याचे निवडणूक आयोग अधिकाऱ्यानी सांगितले आहे.