
no images were found
‘प्राजक्ता माळी पृथ्वीक प्रताप या दोघांचा व्हिडिओ पाहून चाहत्यांना शंका ?
साचेबद्द मालिकांना बगल देत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले फारच कमी कार्यक्रम दिर्घकाळ तग धरुन राहतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे सोनी मराठी वर गाजत असलेली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! कोरोना काळातही महाराष्ट्राळा खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणून त्याला ओळखलं जातं. अगदी लोकल ट्रेनपासून ते रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेसबस्टर म्हणून या कार्यक्रमातील स्कीट्स पाहिली जातात. सोशल मीडियावरही या कार्यक्रमातील व्हिडीओ, संवाद आणि पात्रांची चांगलीच चर्चा असते. या कार्यक्रमाने अल्पावधीत प्रचंड लोकप्रियता मिळवली आहे. या लोकप्रियतेचा फायदा कार्यक्रमात काम करणाऱ्या कलाकारांनाही झाला आहे. या कार्यक्रमातील समालोचक प्राजक्ता माळीपासून ते प्रत्यक्षात स्कीटमध्ये काम करणारे वणीता खरात, गौरव मोरे, प्रियदर्शनी इंदिलकर, दत्तू मोरे, पृथ्वीक प्रताप, प्रभाकर मोरे यासारख्या बऱ्याच कलाकारांना प्रचंड फॉलोअर्स या कार्यक्रमाने मिळवून दिले. सोशल मीडियावरही त्यांच्या पोस्टवर कार्यक्रमाचा संदर्भ देत कमेंट्सचा पाऊस पडत असतो. हे कलाकार अनेकदा एकमेकांबरोबरचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. सध्या पृथ्वीक प्रतापचा असाच एक व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे.
या कार्यक्रमाची स्टारकास्ट सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. सोशल मीडियावर या दौऱ्यादरम्यान अनेक कलाकार फोटो, व्हिडीओ आणि इन्स्टाग्राम स्टोरीजच्या माध्यमातून चाहत्यांशी कनेक्ट आहेत. अगदी मजेशीर व्हिडीओंपासून ते नेमकी कुठे भटंती सुरु आहे यासंदर्भातील पोस्ट कलाकार करत असतात. पृथ्वीक प्रतापने केलेल्या अशाच एका पोस्टवरुन अगदी प्राजक्ता माळीने त्याला होकार दिलाय की काय अशी शंका चाहत्यांना आली आहे. पृथ्वीक प्रतापने त्याच्या इन्स्टाग्रामवर केलेल्या पोस्टमध्ये तो फुटपाथवरुन चालताना दिसत आहे. करड्या रंगाचं जॅकेट, पिवळं शर्ट आणि डेनिम अशा लूकमध्ये पृथ्वीक फारच हॅण्डसम दिसत आहे. या व्हिडीओला शाहरुख खान आणि जुही चावलाच्या ‘यस बॉस’ चित्रपटातील ‘मै कोई ऐसा गीत गाऊ’ गाणं वापरण्यात आलं आहे.
पृथ्वीक चालत असतानाच अचानक प्राजक्ता माळी व्हिडीओ फ्रेममध्ये एन्ट्री करते आणि त्याचा हात धरुन चालू लागते. प्राजक्ताने वन पीस परिधान केला असून हातात लाल रंगाची छोटी पर्स पकडली आहे. हातात हात घालून दोघे एकमेकांशी हसत गप्पा मारताना चालताना दिसत आहेत