no images were found
डी.के.टी.ई. मध्ये ‘टेक-सिंपोझियम २०२४‘ राष्ट्रीयपातळीवरील आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा उत्साहात संपन्न
इचलकरंजी : अभियंत्यांनी त्यांच्या कंपनीमध्ये काम करीत असताना किती शिस्तप्रिय असावे बदलत्या नविन टेक्नॉलॉजीनुसार कोणत्या गोष्टींचा स्वीकार करावा तसेच भारतामध्ये ब-याचशा जापनिज कंपन्या ज्या स्थायिक झालेल्या आहेत त्यांच्यामधील नविन टेक्नॉलॉजी आणि त्या सोबतची त्या कंपनीची शिस्तप्रियता याचा आदर्श नविन अभियांत्यांनी घ्यावा असे प्रतिपादन, सुनिल मेहता, जनरल मॅनेजर इफॅक्टरी, स्टॅटेजिक प्लॅनिंग मित्स्युबीशी इलेक्ट्रीकल यांनी डीकेटीईमध्ये टेकसिंपोझियम २०२४ या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी केले.
मित्स्युबीशी इलेक्ट्रीक इंडियाचे हेवी बिझनेस प्रमुख के.टी.चौगुले आणि रोहन गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती. रोहन गवळी यांनी भारतीय उत्पादन उदयोगात सीसीलिंक औद्यगिक इथरनेट नेटवर्कचा विस्तार करण्यासाठी सीएलपीए इंडिया सीसी लिंक पार्टनरस असोसिएशनचे कार्य सादर केले. डीकेटीईचे ट्रस्टी रवी आवाडे यांनी अभियांत्रिकी क्षेत्रातील टेक्नीकल इंव्हेटचे महत्व याबाबत महत्वाचे मार्गदर्शन केले. संस्थेच्या प्र. संचालिका डॉ एल.एस.अडमुठे यांनी डीकेटीई संस्थेचा प्रगतीचा आढावा घेत टेकसिंपोझिएम २०२४ या कार्यक्रमाची माहिती दिली. प्रा.ए.एल.मुल्ला यांनी उपस्थित प्रमुख पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रा. जॉयलुईस रॉड्रिग्युस, यांनी मान्यवरांचे अभार मानले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विद्यार्थी समन्वयक मृणमयी जोशी,अनुज वर्मा यांनी केले.
डीकेटीईने टेकसिंपोझियम या वार्षिक मेगा टेक्नीकल इव्हेंट चे आयोजन करण्याची परंपरा कायम ठेवली असून देशातील विद्यार्थ्यांना टेक्नीकल इव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रीय व्यासपीठ प्रदान केले. दरवर्षी टेकसिंपोझियम विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी विविध उपक्रम आयोजित करण्याचा डीकेटीईचा सतत प्रयत्न असतो. या ही वर्षी ही स्पर्धा अभियांत्यांना भविष्यातील टेक्नीकल बाबी आणि जगात घडत असलेल्या नविन घडांमोंडीवर त्यांची मते आणि विचारांची देवाण घेवाण करण्यासाठी व्यासपीठ प्रदान करण्याचे उदिदष्ट डोळयासमोर ठेवून आयोजित केली होती. या वर्षी कॉलेजमधील ७ अभियांत्रिकी विभागांमध्ये १२ टेक्नीकल इव्हेंट अयोजित करण्यात आले होते. ज्यामध्ये १२५० हून अधिक स्पर्धाकांनी सहभाग नोंदविला होता.
कॉम्पुटर विभागातर्फे द बाईट सागा, अर्बन नोव्हा इन्व्होएशन फेअर, आय आणि एआय फ्री हँण्ड, इंटरव्हिव आयक्यु : द अल्टिमेंट मॉक चॅलेंज, सिव्हील विभागातर्फे कॅडोनोव्हा, सर्व्हेस्पेक्टरा, इटीसी विभागातर्फे टेकअक्ष, क्रिप्टीकक्वेस्ट, इलेक्ट्रीक विभागातर्फे टेकबिल्ट, वर्ड वॉरिएरर्स, मेकॅनिकल विभागातर्फे मेकडार्ट, सिएनसी वॉर या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा रोख रक्कम व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला. सदर कार्यक्रमात विविध टेक्नीकल स्पर्धेमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी अग्रेसर होते.