Home शैक्षणिक शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत रहावे-विशाल लोंढे

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत रहावे-विशाल लोंढे

9 second read
0
0
50

no images were found

शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्ययावत रहावे-विशाल लोंढे

 

कोल्हापूर,  : शिक्षण प्रक्रिया गतीमान व्हायची असेल तर चाकोरीबद्ध अध्यापन पध्दती सोडून सर्वसमावेशक अध्यापन पध्दती अंगिकारली पाहिजे. शाळांची गुणवत्ता वाढायची असेल तर मुलांचे मन, मेंदू आणि मनगट बळकट झाले पाहिजे. यासाठी शाळेतील शिक्षकांनी बदलत्या काळानुसार अद्यायावत राहून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करावा, असे प्रतिपादन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले.

       इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील आश्रमशाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या एकदिवसीय कार्यशाळा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रा. दुर्गेश वळवी, श्रीशैल्य मठपती उपस्थित होते.

        श्री. लोंढे म्हणाले, शालेय स्तरावर मुलांची गुणवत्ता वाढवायची असेल त्यांच्या अंगभूत कौशल्यांचा विकास करणे गरजेचे आहे. यासाठी शाळा स्तरावर नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले पाहिजे तरच शाळेतून उच्च पदस्थ अधिकारी तयार होतील.यावेळी विषयानुसार तज्ञ मार्गदर्शकांनी शिक्षणाचे महत्त्व सांगितले. शिवाय बदलत्या शिक्षण प्रवाहातील आव्हानांना कसे सामोरे जायचे याविषयी विस्तृत मार्गदर्शन केले.

      डॉ. श्रीकांत पाटील, पी.एस.पाटील, संजय गावडे, आनंदराज पाटील, धनाजी पाटील, ओंकार कुलकर्णी, दिपक शेट्ये,राजेश पिष्टये, द्वारकानाथ भोसले, श्रीशैल्य मठपती यांनी मार्गदर्शन केले. यावेळी समाजकल्याण निरीक्षक राहुल काटकर, प्रदीप जाधव, नितीन सुतार, अमोल खोत, कार्यशाळा कमिटी अध्यक्ष शिवाजी कोरवी यांच्या सह सर्व कमिटी सदस्य, सर्व आश्रामशाळांचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक शंकर पाटील तर सूत्रसंचालन विकास तोरस्कर यांनी केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर

टोयोटा किर्लोस्कर मोटरच्या अर्बन क्रूझर हायरायडरमध्ये आता नव्या प्रगत वैशिष्ट्यांची भर &nb…