no images were found
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल मियाँदाद चे वादग्रस्त वक्तव्य
भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅच खेळायला घाबरतो, असा जावेद मियाँदादचा स्वत:चा तर्क आहे. “भारत पाकिस्तानसोबत क्रिकेट मॅचमध्ये हरला, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी गायब होतील. जनता मोदींना सोडणार नाही” असं मियाँदाद म्हणाला. “पाकिस्ताकडून पराभव होत असल्याने भारताने शारजाहच्या मैदानातून पळ काढला होता. पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर भारतीय टीमच्या अडचणी वाढतात. तिथल्या मोठ्या खेळाडून नुकसान सोसाव लागतं” अशी वायफळ बडबड मियाँदादने केलीय.
सध्या भारतीय क्रिकेट बोर्ड BCCI आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड PCB मध्ये वाद सुरु आहे. या वादाच कारण आहे, आशिया कप 2023 टुर्नामेंट. बीसीसीआयने आशिया कप 2023 स्पर्धेबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. बहरीनमध्ये आशियाई क्रिकेट काऊन्सिलची बैठक झाली. या बैठकीत बीसीसीआयने आशिया कप 2023 स्पर्धा खेळण्यासाठी अजिबात पाकिस्तानात येणार नाही, असं स्पष्ट केलं. बीसीसीआयने आपली भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे पाकिस्तानचा चांगलाच तिळपापड झाला आहे. त्यातून या सगळ्या वादाची सुरुवात झालीय. स्वत: पीसीबीच्या अध्यक्षांसह त्या देशातील क्रिकेटर्स भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदादने बोलताना सर्वच मर्यादा ओलांडल्या आहेत.