no images were found
प्रायव्हेट स्कूलमध्ये आज पासून ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात
कोल्हापूर(प्रतिनिधी) : प्रायव्हेट स्कूलमध्ये आज पासून ५० व्या शालेय विज्ञान प्रदर्शनास सुरुवात झाली . विद्यार्थ्यांच्या नवनवीन संकल्पना आणि त्यांच्या कल्पक अभूतपूर्व अशा उत्साहा स विज्ञान शिक्षकांनी दिलेली साथ यामुळे अनेक नव नवीन प्रकल्प कलाकृती यामध्ये पाहायला मिळत आहेत .विशेषतः सरनाईक कॉलनी शिवाजी पेठेतील आदर्श प्रशालेची शेणापासून खता स ह इथेनॉल निर्मिती हा प्रकल्प आणि दसरा चौकातील मुस्लिम बोर्डिंग स्कूलचा बँकिंग साक्षरता हा प्रकल्प हा अत्यंत दखलपात्रासाठी ठरलेला आहे आदर्श प्रशालेच्या विज्ञान शिक्षिका संगीता शिंदे तसेच मुख्याध्यापक आर वाय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सुमित जिल्हेदार यांनी केलेला हा प्रकल्प आणि त्याचे मराठी सह इंग्रजी भाषेत होणारे सफाई सादरीकरण हे सर्वांचे जाणकारांचे लक्ष वेधून घेणारे असे ठरलेले आहे आगामी तीन दिवस पालकांनी आणि जाणकारांनी हे प्रदर्शन पाहून भविष्यातील वैज्ञानिक यांची झलक येथे अनुभवावी असे आवाहन संयोजकांनी केलेले आहे .