
no images were found
सागरा प्राण तळमळला नाट्यप्रयोगास उस्फुर्त प्रतिसाद
कोल्हापूर(प्रतिनिधी) : स्वातंत्रवीर सावरकरांचे विज्ञानवादी, देशप्रेम आणि हिंदुत्वाचे विचार आपल्यामध्ये नेहमीच उत्साह आणि देशप्रेम जागवतात. अत्यंत प्रेरणात्मक विचार स्वातंत्रवीर सावरकरांनी रूजवले याच विचारांचा जागार “हर घर सावरकर” या संकल्पनेतून करण्यात येणार आहे. या संकल्पनेतून स्वातंत्रवीर सावरकरांच्या देशभक्तीचे विचार घराघरात पोहचविण्यात येणार असून, मुख्यमंत्री ना.मा.श्री.एकनाथ शिंदे साहेब यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम शिवसेना- भाजप युतीच्या वतीने राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने आज “संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, कोल्हापूर” येथे “सागरा प्राण तळमळला” या नाट्यप्रयोगास कोल्हापूरवासियांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. प्रचंड संख्येने सदर प्रयोग हाऊसफुल्ल झाला. प्रयोगादरम्यान हिंदुत्ववादी, सावरकर प्रेमी आणि नाट्य रसिकांचा प्रतिसाद वाखाणण्याजोगा होता. स्वातंत्रवीर सावरकर यांचे विचार घरोघरी पोहचवणे या प्रामाणिक जाणीवेतून ही मोहीम सुरु आहे.