
no images were found
आंतरभारती चषक बुद्धिबळ स्पर्धेत जयसिंगपूरच्या दिशा पाटीलने अजिंक्यपदक पटकाविले
कोल्हापूर(प्रतिनिधी) : अरिहंत सोशल अँड एज्युकेशनल ट्रस्ट कोल्हापूरने पुरस्कृत केलेल्या व आंतरभारती शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या पहिली आंतरभारती चषक बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.कोल्हापूर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम आठव्या फेरीमध्ये पहिल्या पटावर अटीतटीच्या लढतीत द्वितीय मानांकित जयप्रभा इंग्लिश स्कूल जयसिंगपूर च्या दिशा पाटील ने आघाडीवर असलेल्या चतुर्थ मानांकित ज्ञानगंगा प्राथमिक विद्यामंदिर जांभळीच्या अभय भोसलेचा पराभव करीत आठ पैकी साडेसात गुण मिळवून अजिंक्यपद पटकावले व पहिल्या आंतरभारती चषकावर आपले नाव कोरले. तिला रोख तीन हजार रुपये व चषक देऊन गौरविले. अभय भोसलेला सात गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले त्याला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन सन्मानित केले