Home राजकीय पार्लमेंट पिकनिक स्पॉट विषयात राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध

पार्लमेंट पिकनिक स्पॉट विषयात राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध

16 second read
0
0
9

no images were found

पार्लमेंट पिकनिक स्पॉट विषयात राहुल गांधी आणि काँग्रेस खासदारांचा भाजपा कोल्हापूरच्या वतीने तीव्र निषेध

कोल्हापूर:12 मार्च 2026 रोजी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्पीय बजेट सुरू असताना देशाच्या अशा महत्वपूर्ण ठिकाणी काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी व काँग्रेसचे खासदार व अन्य पक्षातील काही खासदारांनी संसदेतील मकर प्रवेशद्वारा जवळ चहा बिस्किट सोबत चाय पार्टी आयोजित केली. ही अत्यंत खेद जनक आणि आक्षेपार्य बाब आहे. संसद ही आपल्या देशाची सर्वोच्च लोकतंत्र संस्था आहे. त्याची प्रतिष्ठा व मर्यादा राखणे प्रत्येक लोकप्रतिनिधीची जबाबदारी आहे.

       परंतु या घटनेच्या माध्यमातून संसद परिसरात एक प्रकारे “पार्लमेंट पिकनिक स्पॉट” बनवण्याचा प्रयत्न झाला. मकर प्रवेशद्वार या ठिकाणी कोणालाही धरणे – प्रदर्शने करू नये असे लोकसभा अध्यक्षांचे स्पष्ट निर्देश असून देखील काँग्रेस पक्षाच्या वतीने या सर्वांचे उल्लंघन करण्यात आले. जे संसदीय नियमांची व अध्यक्षांच्या आदेशाची अवहेलना करणारे आहे.
       या घडलेल्या कृत्याचा भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला.सकाळी 11 वाजता भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते एकत्र येत या सर्वांनी राहुल गांधींचा धिक्कार असो, काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो अशा घोषणा दिल्या.संसद का अपमान नही सहेगा हिंदुस्तान,
संसद के सन्मान मे भाजपा मैदान मे,लोकशाही वरील कलंक राहुल गांधी,संसदेत चर्चा हवी देशाच्या विकासाची पण राहुल गांधीला आवड फक्त हुल्लडबाजीची,संसदेचा अपमान करणे हेच काँग्रेसचे धोरणअशा आशांचे फलक या ठिकाणी दाखवण्यात आले.

       याप्रसंगी बोलताना खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सत्तर वर्षांमध्ये जेवढे काय लोकप्रतिनिधी खासदार म्हणून मंत्री म्हणून निवडून गेले हे या सभागृहाला मंदिर मानतात कारण या देशातल्या 144 करोड लोकांचे प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांना न्याय देणे, त्यांना आधार देणे त्यांच्या जखमांवर फुंकर घालण्याची कामे दिल्लीच्या या सभागृहामध्ये होत असतात परंतु दोन दिवसांपूर्वी आपण सगळ्यांनी एक विचित्र चित्र पाहिले म्हणजे काँग्रेसचे नेते राहुल गांधी व अन्य खासदारांनी या संस्थेला पिकनिक स्पॉट सारखे दृश्य देण्याचे काम केले. मकरद्वार जे संसदेचे प्रथमद्वार आहे या ठिकाणी त्यांनी खासदार म्हणून गप्पागोष्टी चेष्टा-मस्करी करत त्या पलीकडे जाऊन चहा बिस्किट खाण्याचे पाप केले. ह्या घटनेचा जाहीर निषेध करतो.
      राहुल गांधी देशाच्या या सभागृहामध्ये त्यांना साजेसे असे वर्तन करताना दिसत नाहीत टी-शर्ट पॅट घालून कॉलेज कुमार सारखे त्यांचे वर्तन पाहायला मिळते त्याचेच अनुकरण त्यांचे इतर सदस्य देखील करताना पाहायला मिळत आहेत.
काँग्रेस आणि राहुल गांधी देशभरात खोटा नॅरेटिव्ह सेट करण्यासाठी प्रसिद्ध आहेतच या ठिकाणी देखील राहुल गांधी यांनी देशभरात घरगुती गॅस टंचाई असल्याचा खोटा नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला परंतु देशाचे सक्षम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार देशाच्या प्रत्येक नागरिकाला ऊर्जा सुविधा पुरवण्याकरिता वचनबद्ध होऊन सातत्याने काम करीत आहेत. त्याचबरोबर भविष्यामध्ये जर अशा पद्धतीच्या आणखीन काहीतरी खोडी करण्याचा प्रयत्न विरोधकांनी केला तर जशास तसे उत्तर भारतीय जनता पार्टीच्या वतीने दिले जाईल हे देखील सांगितले.

      यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव म्हणाले, राहुल गांधी हे सातत्याने देशाची प्रतिमा मलिन करण्याचे काम करीतच आहेत ही घटना त्याचाच एक भाग आहे. देशाच्या नागरिकांची दिशाभूल करणे हे त्यांचे दैनंदिन काम झाले आहे. जगामध्ये जो युद्धाचा भडका सुरू आहे त्यामुळे जगभरामध्ये पेट्रोल डिझेल गॅस मध्ये वाढ झाली आहे परंतु भारत हा एकमेव देश आहे या ठिकाणी पेट्रोल डिझेलचा दरामध्ये एकही रुपये वाढ झालेली नाही त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मनःपूर्वक मनःपूर्वक अभिनंदन करतो,त्याचबरोबर जगभरात युद्धजन्य परिस्थितीमध्ये देशात शांतत आणि स्थैर्य अबाधित राखल्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.

       यावेळी भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी देखील मनोगत व्यक्त करताना या घटनेचा तीव्र निषेध केला.यावेळी खासदार धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक,अशोक देसाई, राजसिंह शेळके, विशाल शिराळे, हेमंत आराध्ये, माधुरी नकाते, रेखा उगवे, विजय अग्रवाल,किरण नकाते, सयाजी आळवेकर, विश्वजीत पवार रवी पाटील दिग्विजय कालेकर, नितीन पोवार, उमा पोवार, धीरज पाटील, सुनील पाटील, प्रीतम यादव, प्रशांत अवघडे, थला मनेर, भरत काळे, प्रसाद नरुले, गिरीश साळुंखे, बबलू फाले, संभाजी शिंदे, किरण सुतार, रवींद्र घाटगे, राजेंद्र जाधव, प्रकाश घाटगे, अनिल कोळेकर, जनार्दन पोवार, राकेश गुंदेशा, संग्राम पाटील, संग्रामसिंह निकम, अमोल पालोजी, दीपक काटकर, ओंकार गोसावी, भूषण कानकेकर, सुधीर राणे, सचिन पोवार, किरण कुलकर्णी यांच्यासह भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In राजकीय
Comments are closed.

Check Also

भंगार हे पुस्‍तक उकिरड्यावर जगणाऱ्या मुलाची संघर्षमय कहाणी – अशोक जाधव 

भंगार हे पुस्‍तक उकिरड्यावर जगणाऱ्या मुलाची संघर्षमय कहाणी – अशोक जाधव   …