Home सामाजिक कोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोप

कोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोप

8 second read
0
0
7

no images were found

कोल्हापूरकरांच्या प्रचंड प्रतिसादात कंदमूळ महोत्सवाचा समारोप

कोल्हापूर(प्रतिनिधी): निसर्गअंकुर,कोल्हापूर वुई केअर एनजीओ कम्पॅशन २४ या संस्थेच्या आयोजनातून तसेच श्री. शाहू छत्रपती शिक्षण संस्था,गार्डन्स क्लब ,युथ ऍनेक्स , वुई केअर हेल्पलाईन या संस्थांच्या सहकार्याने २५०हून अधिक कंदमुळांचे माहितीपूर्ण शास्त्रीय प्रदर्शन कोल्हापूर शहरातील शहाजी कॉलेजच्या यशवंतराव चव्हाण सभागृह,दसरा चौक येथे आयोजित करण्यात आले होते. या दोन दिवसीय कंदमूळ महोत्सवाची आज सांगता झाली. कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनास प्रचंड प्रतिसाद दिला. अनेकांनी विक्रीस असलेल्या कंदमुळांची खरेदी केली. तर काहीजणांनी आपल्या बागेत तसेच शेतात लागवडीसाठी कंदमुळे खरेदी केली. तसेच कंदमळांपासून बनवलेल्या विविध पदार्थांचा आस्वादही घेतला. अतिशय दुर्मिळ आणि लुप्त होत चाललेली प्राचीन कंदमुळे प्रदर्शनात ठेवण्यात आली होती. रताळ्याचे, बटाट्याचे अनेक प्रकार तसेच अळूचे आणि हळदीचे विविध प्रकार या प्रदर्शनामध्ये ठेवण्यात आले होते. तसेच प्रत्येक कंदमुळाची अभ्यासपूर्ण माहिती त्यातील औषधी गुणधर्म आणि त्याचा आहारात वापर कसा करावा याची माहिती देखील देण्यात आली होती. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या प्रदर्शनास मोठी गर्दी केली होती. आदिमानवापासून ते रामायण महाभारत अशा प्राचीन काळामध्ये कंदमुळे हे महत्त्वाचा घटक मानले जायचे. परंतु कालांतराने त्यांचे महत्त्व कमी झाले. परंतु या प्रदर्शनामुळे पाच राज्यातून आणलेली कंदमुळे लोकांना बघायला मिळाली. त्यांची ओळख झाली तसेच त्यांचे शास्त्रीय महत्त्व समजले.
        मोहन माने यांच्या प्रयत्नातून पाच राज्यांसह महाराष्ट्रातील २५० कंदमुळे या प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. निसर्ग अभ्यासक डॉ. मधुकर बाचूळकर यांनी सांगितले.“लेट्स गेट बॅक टु अवर रूट्स “ह्या ब्रीदवाक्याचा अंगिकार करून आपल्या मातीत वाढणाऱ्या, रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या आरोग्यवर्धक कंदमुळांची माहिती घेऊन चौकस आहारातून सुदृढ पिढी घडवण्यासाठी अशा प्रकारचे प्रदर्शन दरवर्षी भरवण्यात येणार असल्याचे एनजीओ कम्पॅशन २४”, “कोल्हापूर वुई केअर “चे अध्यक्ष मिलिंद धोंड यांनी समारोपा प्रसंगी सांगितले.
        या प्रदर्शनात कणगा ,काटे कणंग ,कोराडू ,करांदा, वराहकंद ,वासकंद ,पासपोळी , शेंडवेल ,कडुकंद, आळसी ,शेवळा , सुरण ह्या वनस्पतींची कंदमुळे , हवाई बटाटे, कंदीका आणि कंदक तसेच मोठा कासार अळू ,काळा अळू ,हिरवा अळू ,पांढरा पेरव , उंडे ,शेडवाळे असे अळुंचे विविध प्रकार आणि त्यांचे कंद , त्याचबरोबर काळी हळद ,आंबेहळद ,रानहळद ह्या सारखे हळदीचे विविध प्रकार व त्यांचे कंद तसेच अमेरिकन अळू, चिनी बटाटे इ.विदेशी कंदमुळे अशाप्रकारच्या सुमारे २५० हुन अधिक प्रकारच्या कंदाच्या जाती, प्रजातींची मांडणी केली आहे.
         गार्डन्स क्लब,सौ.मंजिरी कपडेकर कूकींग क्लासेस , प्रा. डॉ. एन. डी.पाटील महाविद्यालय, मलकापूर ,युथ ऍनेक्स आणि वुई केअर हेल्पलाईन या संस्थांचे सहकार्य प्रदर्शनास लाभले आहे.वुई केअरचे प्रमुख मिलींद धोंड,निसर्ग अंकुर संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.मधुकर बाचुळकर, मोहन माने,गार्डन्स क्लबच्या अध्यक्षा पल्लवी कुलकर्णी, भूषण पाटील,अभिजीत पाटील, अमृता वासुदेवन, सुप्रिया भस्मे, प्रा.अशोक वाली, किशोर शिंदे आदी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक
Comments are closed.

Check Also

केंद्र सरकारच्या विबीजी रामजी योजनेतून ऊसतोड मजुरांना रोजगार आणि कामाचे पैसे द्यावेत,

केंद्र सरकारच्या विबीजी रामजी योजनेतून ऊसतोड मजुरांना र…