Home आरोग्य डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२५ रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२५ रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी

0 second read
0
0
118

no images were found

डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये १२५ रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी

कोल्हापूर : डी. वाय. पाटील हॉस्पिटल, कदमवाडी येथे झालेल्या विशेष शिबिरामध्ये १२५ हून अधिक रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी करण्यात आल्या. अमेरिकेतील जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला, त्यांचे सहकारी व डी. वाय. पाटील हॉस्पिटल सर्जरी विभाग यानी संयुक्तरीत्या  या शस्त्रक्रिया केल्या.

पद्मश्री डॉ. शरद दीक्षित (अमेरिका) यांच्या स्मरणार्थ डॉ.डी.वाय.पाटील रुग्णालय कदमवाडी येथे २४ आणि २५ सप्टेंबरला मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. डी.वाय.पाटील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल अँड रिसर्च इंस्टीटयूट, भारतीय जैन संघटना, जैन डॉक्टर्स फेडरेशन, डॉ. शीतल पाटील फौंडेशन, कृष्णा डायग्नोस्टिक, बी.एम.टेक स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व समाजातील रुग्णासाठी हे शिबीर घेण्यात आले. डॉ. दीक्षित यांचे शिष्य अमेरिकेतील जगविख्यात प्लास्टिक सर्जन डॉ. राज लाला व सहकारी व रुग्णालयाचे डॉक्टर्स व कर्मचारी यांनी शिबिरात २०० पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी केली. यातील १२५ रुग्णांवर मोफत प्लास्टिक सर्जरी केल्या. डॉ अमित बसन्नावार यांनी त्यांना सहकार्य केले.

शिबिरामध्ये दुभंगलेले ओठ, चेहऱ्यावरील विद्रूपता, व्रण, डाग, नाक व कान यावरील बाह्यव्यंग, पापण्यांमधील विकृती अशा सर्वसामान्यांना न परवडणाऱ्या शस्त्रक्रिया मोफत करण्यात आल्याची माहिती वैद्यकिय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड यांनी दिली. डी .वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी.पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. आर. के. मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले, अधिष्ठाता डॉ आर. के. शर्मा यांनी  डॉक्टरांच्या पथकाचे अभिनंदन केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In आरोग्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली

एईएसएल ने मजबूत ऑर्डर पाइपलाइनसह क्यू4 आणि आर्थिक वर्ष26 मध्ये भक्कम कामगिरी नोंदवली अहमदा…