no images were found
कोल्हापूर येथील श्री शाहू मिल पुनर्जीवित करू : वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील
शाहू मिलचा भोंगा पुन्हा वाजणार
कोल्हापूर : कोल्हापूर येथील श्री शाहू मिल पुनर्जीवित करून ती सुरू करण्यात येणार असून मिलचा भोंगा पुन्हा एकदा कोल्हापूरांना ऐकू येणार असल्याचे वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
वस्त्रोद्योगमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, श्री शाहू मिल पुन्हा सुरू करून भोंगा सुरू करण्यासाठी राजर्षी छत्रपती शाहु स्मृती व विचार जतन समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीच्या शिफारशी आणि मार्गदर्शक सूचनांचे पालन व अटींची पूर्तता करून ही मिल पुनर्जीवित करून भोंगा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.
यामध्ये भोंगा वाजविण्याकरिता घ्यावा लागणाऱ्या शासकीय परवानग्यांच्या अधिन राहून प्रथम 6 महिन्यांसाठी महामंडळाची हरकत नाही. तसेच मिलच्या आवारात भोंगा योग्य ठिकाणी बसवण्यासाठी आणि संपूर्ण तांत्रिक बांबीची पूर्तता करण्यासाठी लागणाऱ्या खर्चाची जबाबदारी समितीची राहील. या सर्व नियमांचे कटाक्षाने पालन करून ही प्रक्रिया तातडीने सुरू करण्यात यावी, असेही मंत्री पाटील यांनी सांगितले.