no images were found
आ. प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्लेखोरास अटक
मुंबई : काँग्रेस आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर एक भ्याड हल्ला झाल्याची घटना घडली. हा हल्ला महेंद्र डोंगरदेवे नावाच्या इसमाने केला असल्याचे स्पष्ट झाले आहे .त्याला पोलिसांनी अटक केली असून आता या हल्लेखोराचे आई वडील आ. प्रज्ञा सातव यांच्या दारात जाऊन दयेची भिक मागत आहेत.
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावरील हल्ल्याचे पडसाद राजकीय पटलावर उमटले आहेत. महिला आयोगाने देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली,तर अनेक पक्षाच्या लोकप्रतीनिधींनी सरकार टीका करीत या राज्यात लोकप्रतिनिधी ही सुरक्षित नसल्याचे म्हटलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी काल रात्रीच आरोपी महेंद्र डोंगरदिवे याला अटक केली आहे.
दरम्यान, आपल्या मुलाची चूक झाल्याचं म्हणत आरोपीच्या पालकांनी प्रज्ञा सातव यांच्या निवासस्थानी टाहो फोडला. आज आरोपी महेंद्र डोंगरदिवे याचे आई-वडिल आमदार प्रज्ञा सातव यांच्या कळमनुरी इथल्या कोहिनुर निवासस्थानी पोहोचले. आपल्या मुलाला माफ करा अशी विनवणी ते करतायत. माझ्या मुलाने दारूच्या नशेत हल्ला केला असून गावातली दारू बंद करा अशी मागणी त्याच्या आईने केली आहे.
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला केल्यानंतर आरोपी महेंद्र डोंगरदिवे याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. हल्ला केल्यानंतर त्याने दारुच्या नशेत गावात गोंधळ घातला.
आमदार प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला झाला, त्यांना स्वत:च बचाव करता लागला, तिथेही सुरक्षा कमी पडली असा आरोप शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी केला आहे. या हल्लामागील सूत्रधार कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे, काही दिवसांपूर्वी एका नेत्याने जाहीर पणे सांगितले होते की प्रज्ञा सातव यांना घरी बसवणार. घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांची सुरक्षा वाढवण्याची आवश्यकता आहे, याबाबत देखील मी गृह सचिवांशी बोलले असं निलम गोऱ्हे यांनी सांगितलं.