
no images were found
महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने अशासकीय कर्मचारी भरती
कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर यांच्या अखत्यारित असलेल्या महासैनिक दरबार हॉल व लॉन येथे सहाय्यक व्यवस्थापक- 2 एवं सुरक्षा पर्यवेक्षक-1 व लिपीक 1 पुरुष प्रत्येकी 24 हजार 875 रुपये इतके एकत्रित मानधनावर अशासकीय कर्मचारी पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने भरण्यात येणार आहेत. इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 19 ऑगस्ट 2024 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत. अर्जाची छाननी करुन पात्र उमेंदवारांची मुलाखत दिनांक 20 ऑगस्ट 2024 (मंगळवार) रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात दुपारी 12 वाजता घेण्यात येईल, अशी माहिी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल (निवृत्त) डॉ. भिमसेन चवदार यांनी दिली आहे.
ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर असून ती माजी सैनिक या प्रवर्गातून भरण्यात येतील. तसेच सहाय्यक व्यवस्थापक- 2 एवं सुरक्षा पर्यवेक्षक या पदासाठी जेसीओ व लिपीक पदासाठी एन.सी.ओ किंवा जेसीओ म्हणून सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले असावेत. इच्छुकांनी आपले अर्ज व सोबत आधार कार्ड, कामाच्या अनुभव व कोर्स केल्याबाबतची कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. तसेच अर्जामध्ये मोबाईल नंबर नमुद करणे आवश्यक आहे. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहनही डॉ. चवदार यांनी केले आहे.