no images were found
चिंचवडयेथे कारमध्ये सापडले ४३ लाख रुपये: राजकीय संबधाचा संशय
पुणे : पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात सध्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण निर्माण झाले असताना चिंचवड मधील दळवीनगर परिसरात एका कारमध्ये निवडणुक विभागाच्या अधिकाऱ्यांना एका मोटारीत तब्बल 43 लाखांची रक्कम आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
कसबापेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवार अर्ज मागे घेऊ शकतात. मात्र भाजपकडून अजून निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.यादरम्यान कारमध्ये सापडलेली रक्कम नेमकी कोणाची आहे, ती कोठुन कोठे जात होती, ती कायदेशीर आहे का? याबाबतची कोणतीही समाधानकारक उत्तरे कारचालकाने निवडणुक विभागाच्या तपासणी अधिकाऱ्यांना दिली नाही.त्यामुळे संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.कारमध्ये लाखो रुपयांसोबतच पोलिसांना धारदार हत्यारेही आढळून आली. कारचालकाची कसून चौकशी सुरु केली.
चिंचवड पोटनिवडणुकीत एकूण 33 उमेदवार निवडणुक लढवत असून शुक्रवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. त्यामुळे नेमके कोणकोणते उमेदवार अर्ज मागे घेणार आणि कोण प्रत्यक्ष निवडणुक लढवणार हा प्रश्न निर्माण झाला आहे.
.