no images were found
इंदापूर टोल नाक्यावर गांजासह ७०लाखाचा मुद्देमाल जप्त
पुणे : इंदापुर पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या पथकाने सरडेवाडी टोल नाका येथे सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारमध्ये ६० लाख रुपये किमतीचा एकुण २४० किलो ओलसर गांजा मिळून आला. यामध्ये कारसह ७० लाखाचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत रूपेश दिलीप जाधव (रा.वृंदावन पार्क, कसबा, ता. बारामती) व सुनिल तुळशीदास वेदपाठक (रा. वाघज रोड, देवळे पार्क बारामती) या आरोपींना अटक करण्यात आली.
याबाबत अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका क्रेटा कार मध्ये गांजा घेऊन जात असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान, बालगुडे, लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले,सिद्धाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोळे, विकास राखुंडे, विक्रम जमादार यांच्या पथकाने सरडेवाडी टोल नाका येथे सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारला थांबण्याचा प्रयत्न केला.
कारमधील दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यात अपयशी ठरले पोलीसांनी दोघांना ताब्यात घेत गाडीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये व मधल्या सिटचे खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण १२० पॅकेट्स मिळून आले यामध्ये पोलीसांना कॅनावियस वनस्पतीची पाने फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा असा ६० लाख रुपये किमतीचा एकुण २४० किलो ओलसर गांजा मिळून आला व 10 लाख रुपये किमतीची कार व इतर असा एकूण७० लाख२०हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली केली.