Home धार्मिक कानिफनाथ मंदिर वाद; जमावबंदी विरोधी आंदोलनाला यश

कानिफनाथ मंदिर वाद; जमावबंदी विरोधी आंदोलनाला यश

7 second read
0
1
188

no images were found

कानिफनाथ मंदिर वाद; जमावबंदी विरोधी आंदोलनाला यश

अहमदनगर :  जिल्ह्यातील गुहा गावात प्रशासनाने कानिफनाथ मंदिरात अचानक जमावबंदी आदेश लागू केल्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. त्याचबरोबर त्यामुळे ग्रामंस्थामध्ये संतापाची लाट उसळली होती. आज गुहामध्ये संतापलेल्या ग्रामस्थांनी राहुरी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढत दोन तास ठिय्या आंदोलन केलं. अखेर जनभावनेचा आदर करत प्रशासनाने जमावबंदीचा आदेश मागे घेतला आहे.

    काल मात्र प्रशासनाने अचानक जमावबंदीचा आदेश लागू केल्याने ग्रामस्थ संतप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून कानिफनाथ मंदिर आणि मस्जीद अशी न्यायालयीन लढाई सुरू असताना अचानक जमावबंदीचे आदेश दिल्याने प्रशासनाविरोधात ग्रामस्थांनी तहसिल कार्यालयावर भव्य मोर्चा काढत प्रशासनाला आपल्या मागण्या मान्य करण्यास भाग पाडले.

    या आंदोलनात महिलांचा अधिक सहभाग होता. आंदोलकांच्या घोषणाबाजीमुळे तहसील कार्यालय मोठा गोंधळ निर्माण झाला होता. अखेर जनभावनेचा आदर करत प्रशासनाने जमावबंदीचा आदेश मागे घेतला आहे. तसेच आरती, दर्शन आणि धार्मिक परंपरा साजऱ्या करण्यासाठी ग्रामस्थांना परवानगी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. राहुरी तालुक्यातील गुहा गावात शेकडो वर्षांपासून कानिफनाथ महारांजाच्या मंदिरात भाविक गुरूवारी आरती करत असतात.

    कानिफनाथ मंदिराच्या नावे असलेली चाळीस एकर जमिन कोणालाही कल्पना न देता परस्पर वक्फ बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात आली आणि कागदोपत्री कानिफनाथ मंदिर नाव हटवून हजरत रमजान बाबा दर्गा असा उल्लेख करण्यात आल्याने न्यायालयीन लढा सुरू झाला आहे. न्यायालयाचा कोणताही निकाल नसताना कानिफनाथ मंदिरात हिंदू बांधवांना प्रशासनाने काल आरती करण्यापासून रोखल्याने ग्रामस्थ संतप्त झाले.

 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..

महायुतीला भरभरून मतदान केलेल्या नागरिकांचे आभार, खासदार धनंजय महाडिक..   कोल्हापूर (प…