no images were found
कसब्यात हेमंत रासने, चिंचवडमध्ये अश्विनी जगताप
पुणे : भाजपाने कसबा पेठ मतदारसंघात हेमंत रासने यांना आणि चिंचवडमध्ये अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
कसबा मतदारसंघातून भाजप आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडमधून भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. हेमंत रासने पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष आहेत.अश्विनी जगताप या दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी आहेत. त्या प्रतिभा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष आहेत. पहिल्यांदाच निवडणूक लढवतील.”एकेक टप्पा पूर्ण करत केंद्रीय संसदीय बोर्डाने चिंचवडच्या जागेसाठी लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसबा पेठ मतदारसंघात हेमंत रासने यांची निवड केली आहे”, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
ते म्हणाले, “काल देवेंद्रजी आणि मी शैलेंद्र टिळक, कुणाल टिळक यांना भेटलो. पक्ष त्यांना योग्य स्थान देईल. सन्मानाचं स्थान देईल अशा प्रकारे आश्वस्त केलं. त्या दोघांनीही आम्ही पक्षाबरोबर एकनिष्ठ असू असं सांगितलं. टिळक कुटुंबीयांशी काल चर्चा केली. आताच्या वातावरणात ही निवडणूक जिंकणं यादृष्टीने त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी चर्चा करुनच हा निर्णय झाला आहे. शैलेंद्र टिळक यांचं नाव होतंच पण त्याबरोबरीने उदयोन्मुख चेहरा म्हणून कुणालचं नाव समोर होतं. प्रवक्ता म्हणून त्याचं नाव घोषित झालं आहे. पक्ष त्यांच्या पाठीशी असेल”.