Home सामाजिक स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्य दिनी शिवसेनेकडून महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस ८८ हजार शेणी दान

स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्य दिनी शिवसेनेकडून महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस ८८ हजार शेणी दान

0 second read
0
0
18

no images were found

स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या उत्तरकार्य दिनी शिवसेनेकडून महापालिका पंचगंगा स्मशानभूमीस ८८ हजार शेणी दान

कोल्हापूर( प्रतिनिधी ) : राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री.राजेश क्षीरसागर यांचे वडील स्वर्गीय श्री.विनायकराव श्रीपतराव क्षीरसागर (माजी अध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा बेकर्स असोसिएशन) यांना वयाच्या ८८ व्या वर्षी देवाज्ञा झाली. त्यांच्या उत्तरकार्य दिनी सामाजिक कार्यातून आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेच्यावतीने कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीस ८८ हजार शेणींचे दान करण्यात आले.
यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांनी, स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांना भावपूर्ण श्रधांजली अर्पण करीत, क्षीरसागर कुटुंबियांच्या दु:खात शिवसेना परिवार सहभागी आहे. शिवसेनेने नेहमीच समाजकार्याला अग्रस्थान दिले आहे. दु:खाच्या प्रसंगातही सामाजिक भावना जपावी या हेतून स्वर्गीय श्री.विनायकराव क्षीरसागर यांच्या स्मृतींना आदरांजली वाहण्यासाठी शिवसेनेकडून कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा स्मशान भूमीस ८८ हजार शेणींचे दान करण्यात येत असल्याचे सांगितले.
यानंतर शिवसेनेकडून महापालिका शहर अभियंता श्री.नेत्रदिप सरनोबत यांच्या उपस्थितीत ८८ हजार शेणी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सुपूर्द केल्या. यावेळी शिवसेना शहरप्रमुख रणजीत जाधव, उपजिल्हाप्रमुख उदय भोसले, उपजिल्हाप्रमुख तुकाराम साळोखे, उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, अनुसूचित जाती जमाती जिल्हाप्रमुख निलेश हंकारे, उपशहरप्रमुख सुरेश माने, कपिल नाळे, रणजीत मंडलिक. सम्राट यादव, विनायक जाधव, युवासेना संपर्क अधिकारी प्रसाद चव्हाण, रोहन शिंदे, उदय पोतदार, संतोष दिंडे, अभिलाष चव्हाण, ओम कांबळे आदी शिवसेना पदाधिकारी, महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.     

गुरव’ यांच्या बालकाव्य  संग्रहास राज्यस्तर पुरस्कार.       …