Home क्राईम भारतीय महिलांशी ड्रग्ज तस्करीसाठी लग्न, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

भारतीय महिलांशी ड्रग्ज तस्करीसाठी लग्न, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

0 second read
0
0
247

no images were found

भारतीय महिलांशी ड्रग्ज तस्करीसाठी लग्न, मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

नवी दिल्ली : एनसीबीने भारतीय महिलांशी लग्न करणाऱ्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केला आहे. या महिलांचा सिंडिकेटकडून अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी गैरवापर केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे.दिल्ली आणि मुंबईमध्ये एकूण ७ किलो कोकेन जप्त करण्यात आली आहे.
एनसीबीच्या दिल्ली युनिटला विशिष्ट माहिती मिळाली आणि अधिकाऱ्यांनी पश्चिम दिल्लीतील टिळक नगर भागात एका घराची झडती घेतली. या झडतीदरम्यान एका ट्रॉली बॅगमधून सुमारे ५ किलो प्रीमियम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले असून सुमारे ४५ वर्षांच्या महिलेला ताब्यात घेण्यात आले आहे. प्राथमिक तपास, चौकशी आणि डिजिटल फूट प्रिंटिंगच्या आधारे, या कोकेनचा स्रोत मुंबईतील मस्जिद बंदर येथील हॉटेल असल्याची माहिती आहे
तात्काळ कारवाई करत एनसीबीने आणखी दोघांना पकडले. यावेळी सिंडिकेट सदस्य इथिओपियन नागरिकाना अटक करण्यात आली. या लोकांनी कोकेन असलेली ट्रॉली बॅग महिलेकडे दिली होती. नंतर, इथिओपियन नागरिकांच्या अधिक तपासाच्या आधारे, इतर दोन सिंडिकेट सदस्यांना देखील मस्जिद बंदर, मुंबई येथील हॉटेलमधून पकडण्यात आले आणि अशाच प्रकारच्या ट्रॉली बॅगमधून २ किलो प्रीमियम दर्जाचे कोकेन जप्त करण्यात आले. सुमारे ७ किलोग्रॅम कोकेन जप्त केल्याने तस्करीचा नवा प्रकार उघडकीस आला आहे.
या सिंडिकेटमध्ये अंमली पदार्थांचे तस्कर आफ्रिकन देशांतील खालच्या स्तरातील नागरिकांचा वापर करुन ड्रग्ज इकडून तिकडे नेत आहेत. अटक करण्यात आलेले सर्व ड्रग्ज तस्कर हे पहिल्यांदाच भारतात आलेले प्रवासी आहेत. या सिंडिकेटचे व्यवस्थापन नायजेरियन ड्रग्ज स्मगलर्स करत होते आणि दिल्लीतून अटक करण्यात आलेली महिला ही दिल्लीतील सिंडिकेट चालवणाऱ्या एका प्रतिष्ठित किंगपिनची पत्नी आहे. हा किंगपिन आपल्या पत्नीचा तस्करीसाठी वापर करत होता. ही महिला मुंबईहून दिल्लीतील तिच्या घरी आणि पुढे दिल्लीतील इतर तस्करांकडे कोकेन पोहोचवण्याचे काम करत असे आणि त्यानंतर ते संपूर्ण भारतात पोहोचवले जात असे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In क्राईम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण

कोण होतीस तू, काय झालीस तू! मालिकेसाठी अभिनेत्री गिरीजा प्रभू घेतेय लाठीकाठीचं प्रशिक्षण &…