Home पर्यावरण आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हा

0 second read
0
0
7

no images were found

आमदार अमल महाडिक यांचा हरित कोल्हापूरचा संकल्प; शहरात लावणार दहा हजार झाडे

कोल्हापूर, (प्रतिनिधी) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस समाज उपयोगी उपक्रमातून केला जाणार आहे. या निमित्ताने आमदार अमल महाडिक यांच्या वतीने शहरात दहा हजार झाडे लावण्यात येणार आहेत. हरित कोल्हापूरच्या या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. असे आवाहन महाडिक यांच्याकडून करण्यात आले आहे.
जागतिक तापमान वाढीची समस्या जगभर पाहायला मिळते. कोल्हापूर शहरामध्ये दरवर्षीच्या तुलनेत उन्हाळा अधिक उष्ण होत आहे. शहरीकरणाच्या वाढत्या वेगामुळे शहरामध्ये असणारी वृक्षांची हिरवाई कमी होत आहे. त्यामुळे तापमान तर वाढत आहेच पण प्रत्यक्ष तापमानापेक्षा त्याची तीव्रता अधिक भासू लागली आहे. यासाठी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात हरितपट्टे विकसित करणे गरजेचे आहे. ही बाब ध्यानात घेऊन आमदार अमल महाडिक यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा संकल्प केला आहे. शहरामध्ये दहा हजार झाडे लावण्याचा त्यांचा संकल्प असून शहरातील भाजप कार्यकर्त्यांच्या सहभागातून हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्याचबरोबर कोल्हापुरातील ज्या संस्था-संघटना, व्यक्ती यांना या पर्यावरण संवर्धनाच्या उपक्रमात सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांनी आमदार अमल महाडिक यांच्या शाहूपुरीतील कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोल्हापुरातील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी तसेच ऑक्सिजनचा स्तर उंचावण्यासाठी वड, पिंपळ, आंबा, चिंच, करंज,आवळा अशा देशी प्रजातीच्या झाडांची लावण करण्यात येणार आहे. या झाडांची रोपे आमदार अमल महाडिक यांच्याकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून रोप लागवडीनंतर ती जगवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात येत आहे.
लवकरच हरित कोल्हापूरच्या या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ करण्यात येणार असून आगामी काळात कोल्हापूरची आल्हाददायक हवा पुन्हा अनुभवायला मिळेल असा विश्वास आमदार अमल महाडिक यांनी व्यक्त केला आहे.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्यावरण
Comments are closed.

Check Also

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास

करिअर नियोजना पासून प्रवेश प्रक्रिये पर्यंत; केआयटीने दिला विद्यार्थी-पालकांना आत्मविश्वास…