no images were found
महापालिकेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन साजरा
कोल्हापूर : महानगरपालिकेच्यावतीने जागतिक पर्यावरण दिन उत्साह साजरा करण्यात आला. यावेळी कसबा बावडा येथील रेणुका मंदिर च्या मागील शंभरफुटी रोडच्या दोंन्ही बाजूस आयुक्त डॉ.राजेंद्र भारुड यांच्या हस्ते २० देशी वृक्षांचे वृक्षरोपन करण्यात आले. यामध्ये करंज, बकुळ, महोगनी, कदंब, कडुलिंब या जातीची वृक्षे आहेत. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या हस्ते “सीड बॉल” पाणथळ ठिकाणी फेकण्यात आले. त्याचप्रमाणे शाहू उद्यान रंकाळा तलाव जवळी उद्यानात व कसबा बावडा येथील प्रिन्स शिवाजी विद्यालयाच्या आवारात विविध जातीचे वृक्ष लावण्यात आलेत. तसेच वृक्षप्रेमी वेल्फेअर संस्थेच्यावतीने राजेंद्रनगर पाणी टाकी येथील परिसरात 100 देशी वृक्षांचे रोपन करण्यात आले.
यावेळी नगरसेवक विनायक कारंडे, नगरसेविका सौ.स्वाती यवलुजे, सौ.शुभांगी पाटील, सौ.अर्चना बिरांजे, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे, सहा.उद्यान अधिक्षक राम चव्हाण, आरोग्य निरीक्षक स्वप्नील उलपे, उद्यान विभागाकडील कर्मचारी उपस्थित होते. रेड्याची टक्कर येथील वि.स.खांडेरक शाळा परिसारात सहा.आयुक्त स्वाती दुधाणे तसेच महिला बचत गट मार्फत टेंबलाई विक्रमनगर परिसर येथे 45 देशी प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपन करण्यात आले.