Home पर्यावरण जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएचसीएल जबाबदार आदरातिथ्याकरिता वचनबद्ध

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएचसीएल जबाबदार आदरातिथ्याकरिता वचनबद्ध

48 second read
0
0
7

no images were found

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयएचसीएल जबाबदार आदरातिथ्याकरिता वचनबद्ध

 मुंबई, : जागतिक पर्यावरण दिनानिमित्तपाथ्याच्या ईएसजी+ आराखड्यावर आधारित इंडियन हॉटेल्स कंपनी (आयएचसीएल) जबाबदार आदरातिथ्याच्या प्रगतीसाठी आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करते. सकारात्मक बदलाचा मार्ग स्वीकारलेली, पाथ्या स्वच्छ ऊर्जा, जल व्यवस्थापन, चक्रिय कार्ये (सर्क्यूलर ऑपरेशन्स), कचरा कमी करणे, हरित गतिशीलता आणि पडताळणीयोग्य टिकाऊपणा मानकांमधील आयएचसीएलच्या उपक्रमांचे एकत्रीकरण करते.

    गौरव पोखरियाल, कार्यकारी उपाध्यक्ष- मनुष्यबळ, आयएचसीएल म्हणाले, “स्रोत कार्यक्षमतेवर वाढता भर दिल्याने, आतिथ्य किंवा आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी) क्षेत्र कसे चालते याला शाश्वतता अधिक आकार देत आहे. उद्योग जसजसा विकसित होत जातो, तसतशी जाणीवपूर्वक प्रवाशांच्या अपेक्षांना प्रतिसाद देताना पर्यावरणीय कारभाराशी व्यवसायाची कामगिरी संरेखित करण्याची संधी असते. पाथ्या’च्या माध्यमातून आयएचसीएलचा दृष्टिकोन ही दिशा प्रतिबिंबित करतो. आपण ज्या समुदाय आणि परिसंस्थांचा भाग आहोत त्या समुदायांपर्यंत विस्तारणाऱ्या उपक्रमांसह परिचालन/ कामकाज (ऑपरेशन) उपायांना एकत्रित करतो.”

     आयएचसीएल आपला पर्यावरणीय प्रभाव कमी करण्यासाठी सातत्याने प्रगती करत आहे, त्यातील 41% वीज अक्षय उर्जेद्वारे प्राप्त होते. कंपनीने 171 ठिकाणी 386 ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापित केली आहेत, जवळपास 108 इन-हाऊस सेंद्रिय कचरा कंपोस्टिंग प्लांट चालवतात. एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी 85 वॉटर बॉटलिंग प्लांट्स चालवतात. याव्यतिरिक्त, त्याच्या हॉटेलमधील 54% सांडपाण्याचा पुनर्वापर केला जातो.

     आयएचसीएल’च्या सामुदायिक उपक्रमांमध्ये गुजरात, तामिळनाडू आणि कर्नाटकात पाणलोट क्षेत्र पुनर्संचयन करणे, पावसाचे पाणी साठवणे, पारंपरिक जलाशयांचे पुनरुज्जीवन आणि भूजल पुनर्भरण, 50 लाख घनमीटर जल पुनर्भरण आणि तीन वर्षांत बचत करण्याचे लक्ष्य, स्थानिक उपजीविकेला आणि पर्यावरणीय लवचिकतेला पाठिंबा देणे यांचा समावेश आहे. 

आयएचसीएल’ने पाथ्या अंतर्गत 2030 पर्यंत पूर्ण करण्यासाठी अनेक अल्पकालीन आणि दीर्घकालीन उद्दिष्टे निश्चित केली आहेत. अक्षय स्त्रोतांकडून 50% उर्जेपासून, त्याच्या सर्व हॉटेलमध्ये एकदा वापरलेल्या प्लास्टिकचे 100% निर्मूलन, सांडपाण्याचा 100% पुनर्वापर सुनिश्चित करण्यासाठी, कंपनीच्या 100% हॉटेल्सला जागतिक टिकाऊपणा मानक प्रमाणित केले जाईल. 

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In पर्यावरण
Comments are closed.

Check Also

लोकनेते देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही: मंत्री शंभूराज देसाई

लोकनेते देसाई अध्यासनाला निधीची कमतरता भासू देणार नाही: मंत्री शंभूराज देसाई कोल्हापूर, : …