Home Uncategorized राहुल गांधी यांच्या पीएम निवासस्थानासमोरील आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चा कडून तीव्र निषेध

राहुल गांधी यांच्या पीएम निवासस्थानासमोरील आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चा कडून तीव्र निषेध

1 second read
0
0
9

no images were found

राहुल गांधी यांच्या पीएम निवासस्थानासमोरील आंदोलनाचा भारतीय जनता युवा मोर्चा कडून तीव्र निषेध
– कृष्णराज महाडिक, प्रदेशाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा, महाराष्ट्र

 कोल्हापूर : भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिकयांनी राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर करण्यात आलेल्या आंदोलनाचा तीव्र निषेध केला आहे.

यावेळी बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले की, भारताच्या संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांशी संबंधित असलेल्या नीट परीक्षेच्या विषयाला राजकीय स्वरूप देऊन आंदोलनाची दिशा बदलण्याचा प्रयत्न होत असल्याचे त्यांनी म्हटले.

त्यांनी आरोप केला की, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाकडून या आंदोलनाचा राजकीय हेतूंसाठी वापर केला जात असून, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांपेक्षा सरकारविरोधी घोषणाबाजी आणि राजकीय वातावरण निर्माण करण्यावर अधिक भर दिला जात आहे. विद्यार्थ्यांच्या नावाखाली युवकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

महाडिक यांनी सांगितले की, संसदेचे अधिवेशन सुरू असताना लोकप्रतिनिधींनी विद्यार्थ्यांचे प्रश्न संसदेत उपस्थित करणे अपेक्षित आहे. रस्त्यावर आंदोलन करून सामान्य नागरिकांना वेठीस धरण्याऐवजी लोकशाही संस्थांमध्ये विषय मांडणे हा अधिक योग्य मार्ग आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर आंदोलन करून घटनात्मक संस्थांचा अवमान करण्याचा प्रयत्न होऊ नये, असेही त्यांनी नमूद केले.

कालच्या आंदोलनादरम्यान पोलिसांवर दगडफेक, शिवीगाळ आणि धक्काबुक्की झाल्याचे वृत्त समोर आले असून, काही पोलीस कर्मचारी जखमी झाल्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना कारवाई करावी लागल्याचे त्यांनी सांगितले.

महाडिक यांनी पुढे म्हटले की, काही असामाजिक प्रवृत्तीचे तसेच समाजात तेढ निर्माण करणारे घटक या आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसून आले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी आंदोलनाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न झाल्याचे त्यांनी सांगितले.

**भाजपचे वरिष्ठ नेते जे. पी. नड्डा** यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यार्थी प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या असून, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची सरकारची भूमिका स्पष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

महाडिक यांनी सांगितले की, गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक नीट परीक्षार्थी आणि वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता वाढविणे, गैरप्रकारांना आळा घालणे आणि परीक्षा व्यवस्थेतील गैरव्यवहारांचे रॅकेट मोडून काढण्यासाठी काही ठोस सूचना दिल्या असून, त्या संबंधित स्तरावर पोहोचविण्यासाठी ते प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कृष्णराज महाडिक यांनी असा आरोप केला की, **देशविरोधी प्रवृत्तीच्या काही व्यक्ती आणि संघटनांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून युवक व नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या मोहिमेसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक निधी वापरला जात असून, काही सोशल मीडिया पोस्ट प्रसारित करण्यासाठी लाखो रुपये दिले जात असल्याची माहिती समोर येत आहे**, असा दावा त्यांनी केला. समाजात संभ्रम निर्माण करून युवकांना चुकीच्या दिशेने नेण्याचा हा प्रयत्न असून, अशा प्रचारापासून सावध राहण्याचे त्यांनी आवाहन केले.

युवकांना उद्देशून त्यांनी सांगितले की, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या प्रत्येक माहितीवर विश्वास ठेवण्याआधी तिची सत्यता पडताळून पाहावी. अफवा, दिशाभूल करणारा प्रचार आणि राजकीय स्वार्थासाठी चालविल्या जाणाऱ्या मोहिमांना बळी न पडता संविधानिक मार्गाने आपले प्रश्न मांडावेत, असे त्यांनी आवाहन केले.

  “भारतीय जनता युवा मोर्चा विद्यार्थ्यांच्या न्याय्य प्रश्नांबाबत संवेदनशील असून, त्यांचे प्रश्न शासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहील. युवकांची दिशाभूल करणाऱ्या कोणत्याही प्रवृत्तीला भारतीय जनता युवा मोर्चा ठामपणे विरोध करेल,”असे कृष्णराज महाडिक यांनी शेवटी सांगितले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीस…