Home Uncategorized मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त भाजयुमोच्यावतीने वेळे आणि शेंद्रे गावात महाश्रमदान, रक्तदान आणि वृक्षारोपण शिबिर संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त भाजयुमोच्यावतीने वेळे आणि शेंद्रे गावात महाश्रमदान, रक्तदान आणि वृक्षारोपण शिबिर संपन्न

3 second read
0
0
8

no images were found

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त भाजयुमोच्यावतीने वेळे आणि शेंद्रे गावात महाश्रमदान, रक्तदान आणि वृक्षारोपण शिबिर संपन्न

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त भाजयुमोच्यावतीने आणि ग्रामपंचायत वेळे यांच्या सहकार्याने महाश्रमदान शिबिर घेण्यात आले. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक आणि नाम फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांच्या उपस्थितीत सोळशी रोडवरील घाट पायथ्याजवळ जलसंधारण श्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून, सातारा जिल्हयातील वेळे इथल्या सोळोशी रोड घाट पायथ्याजवळ महाश्रमदान आणि वृक्षारोपण उपक्रम राबवण्यात आला. भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांच्या संयोजनातून आणि संकल्पनेतून हे शिबिर पार पडले. जलसंधारण विभागाच्या कामासाठी महाडिक आणि नाम फौंडेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश थोरात यांच्या उपस्थितीत श्रमदान करण्यात आले. त्यानंतर घाट पायथ्याशी विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले. कृष्णराज महाडिक यांनी या उपक्रमात सहभागी होवून वृक्षारोपण केले. यावेळी जिल्हा परिषद महिला आणि बालकल्याण विभागाच्या सभापती ऋतुजा शिंदे, वाईच्या पंचायत समिती सदस्य सुरभी भोसले, सातारा भाजयुमो जिल्हाध्यक्ष हर्षल चिकणे, विराज शिंदे, युवा मोर्चा सरचिटणीस पायल जाधव, युवा मोर्चा सरचिटणीस अक्षय भोसले, अमोल कांबळे ,तेजस जमदाडे, नाम फौंडशनचे समन्वयक बाळासाहेब शिंदे, सरपंच अर्चना गायकवाड, उपसरपंच सिंधू ढमाळ, ग्रामपंचायत सदस्या उषा पवार, निलम नलावडे, दशरथ पवार, राहुल ननावरे, विजय पवार, दिपक पवार, सुरेश पवार, विजय नलावडे, गोविंद पवार, विश्वास पवार, सतीश ढमाळ, दत्तात्रय लांडगे, स्वप्नील कांगडे, सिताराम जाधव, दत्तात्रय पवार, अतुल पवार, ग्रामपंचायत अधिकारी श्रुतिका जाधव, सामाजिक वनीकरणाचे श्री भोसले, अनिमेश कुलकर्णी, वाईचे सामाजिक वनीकरण वनक्षेत्रपाल श्री होरे, शेख, वाईचे सामाजिक वनीकरण वनरक्षक श्री गवारी, सौ हांडे तसेच विद्यार्थी यांची उपस्थिती होती. दरम्यान शेंद्रे इथल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिराला कृष्णराज महाडिक, कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक जीवाजी मोहिते, सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार, सातारा दक्षिण मंडल अध्यक्ष शत्रुघ्न धनवडे, बाजार समिती संचालक विजय पोतेकर, अमोल मोरे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कारखान्यांच्या अधिकार्‍यांची उपस्थिती होती. दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरात अधिकारी-कर्मचार्‍यांसह नागरिकांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीसीएला १२.७६ हेक्टर जागा सुपूर्द

कोल्हापूरच्या क्रीडा इतिहासातील ऐतिहासिक निर्णय : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी केडीस…