Home Uncategorized दक्षिण अमेरिकेतील ऊर्जा लॉजिस्टिक्स क्षेत्रात एपीएसईझेडची मोठी झेप

दक्षिण अमेरिकेतील ऊर्जा लॉजिस्टिक्स क्षेत्रात एपीएसईझेडची मोठी झेप

2 second read
0
0
17

no images were found

दक्षिण अमेरिकेतील ऊर्जा लॉजिस्टिक्स क्षेत्रात एपीएसईझेडची मोठी झेप

अहमदाबाद, : भारतातील सर्वात मोठी एकात्मिक परिवहन उपयुक्तता कंपनी असलेल्या अदाणी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड (एपीएसईझेड) ने अर्जेंटिनाच्या पहिल्या द्रवीकृत नैसर्गिक वायू (एलएनजी) निर्यातीसाठी 10 वर्षांचा सागरी सेवा करार प्राप्त केला आहे. या करारामुळे एपीएसईझेड ने दक्षिण अमेरिकेत प्रवेश केला असून, आंतरराष्ट्रीय सागरी सेवा क्षेत्रातील आपला विस्तार अधिक मजबूत केला आहे.

हा करार एपीएसईझेड ची स्टेप-डाउन उपकंपनी द अदाणी हार्बर इंटरनॅशनल एफझेडसीओला अर्जेंटिनास्थित मेरिडियन ग्रुपसोबतच्या कन्सोर्टियमद्वारे प्रदान करण्यात आला आहे. हा करार सदर्न एनर्जी एस.ए. (एसईएसए) यांनी आयोजित केलेल्या जागतिक स्पर्धात्मक निविदा प्रक्रियेनंतर देण्यात आला. या करारामुळे आंतरराष्ट्रीय ऊर्जा लॉजिस्टिक्स मूल्यसाखळीत एपीएसईझेड ची उपस्थिती अधिक मजबूत झाली असून, विशेषीकृत सागरी सेवांमधील तिच्या वाढत्या क्षमतांवर अधोरेखित झाले आहे.

या कराराअंतर्गत, कन्सोर्टियम एलएनजी वाहक जहाजांसाठी टगबोट ऑपरेशन्स, ऑफशोअर लॉजिस्टिक्स आणि पुरवठा सहाय्य तसेच क्रू ट्रान्सफर सेवा यांसह सर्वसमावेशक सागरी सेवा प्रदान करेल. या कामासाठी चार उच्च-विशिष्टतेच्या टगबोटी, एक अँकर हँडलिंग टग सप्लाय व्हेसल आणि एक क्रू बोट वापरण्यात येणार आहे.

एपीएसईझेड चे पूर्णवेळ संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अश्वनी गुप्ता म्हणाले, “हा प्रकल्प विविध भौगोलिक क्षेत्रांमधील मोठ्या ऊर्जा पायाभूत सुविधा प्रकल्पांना पाठबळ देण्याच्या आमच्या वाढत्या क्षमतेचे प्रतीक आहे. 12 देशांमधील सागरी संचालन आणि बंदरे, एलएनजी टर्मिनल्स, राष्ट्रीय तेल कंपन्या, रिफायनरीज आणि ऑफशोअर सुविधांना सहाय्य करणाऱ्या वाढत्या सागरी मालमत्तेच्या ताफ्यासह, आम्ही गुंतागुंतीच्या सागरी वातावरणात सखोल कार्यकारी कौशल्य आणतो. मजबूत स्थानिक भागीदारींसह या क्षमतांचा संगम साधून, आम्ही विश्वासार्ह सागरी परिसंस्था निर्माण करण्यास मदत करत आहोत, ज्यामुळे नवीन ऊर्जा व्यापार मार्ग विकसित होत आहेत आणि दीर्घकालीन पुरवठा सक्षमता बळकट होत आहे.”

अर्जेंटिना एक महत्त्वाचा नवीन एलएनजी पुरवठादार म्हणून उदयास येत आहे. 2027 पासून भारताला दरवर्षी 10 दशलक्ष टन (एमटी) पर्यंत एलएनजी निर्यात करण्यासाठी करार करण्यात आले आहेत. सदर्न एनर्जी Fएलएनजी प्रकल्प वाढत्या पुरवठा क्षमतेला जागतिक मागणी केंद्रांशी जोडण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी अपेक्षा आहे.

सदर्न एनर्जी एफएलएनजी प्रकल्प एसईएसए द्वारे विकसित केला जात आहे, जो गोलार एलएनजी आणि पॅन अमेरिकन एनर्जी (पीएई) यांचा संयुक्त उपक्रम आहे. अर्जेंटिनाच्या रिओ नेग्रो प्रांतातील सॅन मॅटियास आखातात स्थित हा प्रकल्प जनरल सॅन मार्टिन पाइपलाइनमधून येणाऱ्या नैसर्गिक वायूचे द्रवीकरण हिली एपिसेयो या फ्लोटिंग लिक्विफाइड नॅचरल गॅस (एफएलएनजी) जहाजावर करेल. या प्रकल्पाचे व्यावसायिक संचालन सप्टेंबर 2027 मध्ये सुरू होण्याची अपेक्षा आहे.

पहिल्या टप्प्यात, या प्रकल्पातून दरवर्षी 2.45 दशलक्ष टन एलएनजी उत्पादन होण्याची अपेक्षा आहे, जे अंदाजे 28 कार्गो जहाजांच्या समतुल्य आहे. त्यामुळे हा अर्जेंटिनाचा पहिला कार्यरत एलएनजी निर्यात प्रकल्प ठरणार आहे.

हा करार मेरिडियन ट्रान्सपोर्टेस मॅरिटिमोस एस.ए. या अदाणी हार्बर इंटरनॅशनल एफझेडसीओ आणि मेरिडियन ग्रुप यांच्या 51:49 संयुक्त उपक्रमाद्वारे अंमलात आणला जाईल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized
Comments are closed.

Check Also

मोदींची १२ वर्षे म्हणजे राष्ट्रउभारणीचे महातप; भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समाजाने पुढे यावे : मा. शिवप्रकाशजी

मोदींची १२ वर्षे म्हणजे राष्ट्रउभारणीचे महातप; भारताला विश्वगुरू बनविण्यासाठी प्रबुद्ध समा…