no images were found
शिवाजी विद्यापीठात डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती
कोल्हापूर, (प्रतिनिधी): शिवाजी विद्यापीठात आज शिक्षण महर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करण्यात आली.
विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र अधिविभाग परिसरातील डॉ. बापूजी साळुंखे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते पुष्प वाहून अभिवादन करण्यात आले. यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांच्यासह आंतरविद्याशाखा अधिष्ठाता डॉ. अजय साळी, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर, शिक्षणशास्त्र अधिविभागाच्या प्रमुख डॉ. चेतना प्र. सोनकांबळे, गणित अधिविभाग प्रमुख डॉ. मच्छिंद्र गोफणे, आजीवन अध्ययन विभागाचे संचालक डॉ. रामचंद्र पवार, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक डॉ. शरद बनसोडे आणि अधिविभागातील शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, प्रशासकीय कर्मचारी उपस्थित होते.