
no images were found
शब्बीर अहलुवालिया आणि निहारिका रॉय यांनी मालदीवमध्ये केली धमाल!
‘झी टीव्ही’वरील ‘प्यार का पहला नाम राधा मोहन’ ही मालिका प्रसारणास प्रारंभ झाल्यापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. तिचे प्रेमकथेचे कथानक आजच्या काळातील वृंदावनमध्ये घडते. यातील मोहन (शब्बीर अहलुवालिया), राधा (निहारिका रॉय) आणि दामिनी (संभाबना मोहन्ती) यासारख्या दमदार व्यक्तिरेखांमुळे प्रेक्षकांच्या मनात मालिकेविषयी उत्कंठा कायम राहिली आहे. अलीकडच्या भागांत प्रेक्षकांनी पाहिले की गुनगुनला (रीझा चौधरी) ठार मारण्याचा आणि त्याद्वारे मोहनची समाजात दनामी करण्याचा कट दामिनी कशी आखत आहे ते.
आगामी भागांमध्ये प्रेक्षकांना दिसेल की प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवाचे कंत्राट मिळविण्यात मोहनला यश आल्यामुळे मालदीवला जाण्याचा राधा आणि मोहनचा मार्ग प्रशस्त होतो. या घटना वास्तव वाटाव्यात यासाठी मालिकेतील कलाकारांनी मालदीवला भेट देऊन प्रत्यक्ष स्थळांवर चित्रीकरण केले होते.
प्रत्यक्ष स्थळांवर जाऊन चित्रीकरण करणे ही तशी सामान्य बाब असली, तरी अशी स्थळे जर मालदीवसारख्या ठिकाणी असतील, तर कामाबरोबरच सुटीचाही आनंद घेता येतो. मालिकेचे चित्रीकरण वेगात सुरू असले, तरी मालिकेतील शब्बीर अहलुवालिया, निहारिका रॉय आणि संभाबवा मोहन्ती हे प्रमुख कलाकार मालदीवमधील नवनवी ठिकाणे शोधून पर्यटनाचाही आनंद घेत आहेत. त्यांनी अनेक पर्यटन स्थळांना भेटी दिल्या असून सोनेरी वाळूंचे किनारे आणि सागराच्या निळेशार पाण्याचा आनंद घेतला आहे. फावल्या वेळेत त्यांनी बाजारपेठेला भेट दिल्या आणि स्थानिक स्वादिष्ट पदार्थांचा आस्वादही घेतला.
शब्बीर, निहारिका आणि संभाबना हे मालदीवमध्ये धमाल करीत असले, तरी राधा आणि मोहन हे आंतरराष्ट्रीय पुस्तक महोत्सवात कसे जिंकले, ते पाहणे प्रेक्षकांसाठी खूपच उत्कंठावर्धक ठरेल.की ही स्पर्धा जिंकण्याचे त्यांचे स्वप्न दामिनी उद्ध्वस्त करील?