
no images were found
पंतप्रधान पथविक्रेता स्वनिधी अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेचे कर्ज वितरणाचे 100% उद्धिष्ट पूर्ण
कोल्हापूर : पंतप्रधान पथविक्रेता स्वनिधी अंतर्गत कोल्हापूर महानगरपालिकेने कर्ज वितरणाचे 100% उद्धिष्ट पूर्ण केले आहे. महानगरपालिकेने प्रशासक के.मंजुलक्ष्मी व उप-आयुक्त शिल्पा दरेकर यांच्या मार्गदर्शनानुसार हे उद्धिष्ट पुर्ण करण्यात आले आहे.
कोरोना महामारीच्या कालावधीमध्ये आर्थिक अडचणीत आलेल्या फेरीवाल्यांना अर्थसहाय्य करण्यासाठी पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी (PM SAVNidhi) योजना केंद्र शासनामार्फत सुरू करण्यात आली. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लॉकडाऊनमुळे ज्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला होता व ज्या फेरीवाल्यांचे व्यवसाय या कालावधीत बंद राहिल्यामुळे उदरनिर्वाह कसे करायचे हा प्रश्न होता. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर भांडवल नसल्याने पथविक्रेत्यांना त्यांचा व्यवसाय पुन्हा सुरू करण्याचे आव्हान होते. यासाठी केंद्र शासनाच्यावतीने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत पहिले कर्ज रु.10,000/- रक्कम नियमित परतफेड केल्यानंतर दुसरेकर्ज रु.20,000/- मिळते. हि रक्कम नियमित परतफेड केल्यानंतर तिसरे कर्ज रु.50,000/- दिले जाते. कोल्हापूर महानगरपालिका राबवित असलेल्या पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी योजनेअंतर्गत महानगरपालिकेने मागील तीन वर्षात 15356 लाभार्थ्यांना बँकेमार्फत तब्बल 22 कोटी 72 लाख रुपये कर्ज वितरण झाले आहे. महापालिकेला सुरुवातीला रु.10,000/- कर्ज वितरणाचे महानगरपालिकेला 6600 लाभार्थी इतके उद्दिष्ट होते. ऑगस्ट 2023 मध्ये राज्य शासनामार्फत महानगरपालिकेस सुधारित उद्धिष्ट 10,985 इतके करण्यात आले. यासाठी महापालिकेच्या राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, शहरातील विविध बँका आणि महिला आर्थीक विकास महामंडळ यांनी विशेष परिश्रम घेतले. हे उद्दीष्ट यशस्वी करण्यासाठी सर्व फेरीवाले, फेरीवाले संघटनांचे पदाधिकारी या सर्वांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविल्याबद्दल सर्वांचे महापालिकेच्यावतीने अभिनंदन करण्यात येत आहे