
no images were found
‘वसुधा’च्या सेटवर प्रिया ठाकूर बनली शेफ,
असा दिवस रोज रोज येत नाही जेव्हा एखाद्या मालिकेची प्रमुख अभिनेत्री मालिकेच्या सेटवरील किचनमध्ये शिरून सर्वांसाठी जेवण बनवायला घेते. झी टीव्हीवरील ‘वसुधा’ मालिकेतील वसुधाच्या भूमिकेतील प्रिया ठाकूरने हल्लीच सेटवरील लंच ब्रेकमध्ये हे केले. सर्वांचे मन जिंकून घेत प्रियाने स्वतःहून ह्या मालिकेचे कलाकार, तंत्रज्ञ आणि प्रॉडक्शन टीमसाठी आपल्या मालिकेच्या सेटवर लाईव्ह रोटी काऊंटर लावून 100 हून अधिक चपात्या बनवल्या.
‘वसुधा’ ही मालिका चिकाटी आणि ऊबदारपणाबद्दल असून वास्तविकआयुष्यातही प्रिया अशीच आहे. आपल्या समर्पित टीमसाठी प्रेमाने काहीतरी अर्थपूर्ण करण्याच्या इच्छेसह तिने सर्वांसाठी ताज्या ताज्या गरमागरम चपात्या बनवल्या. सेटवरील तिचे सहकलाकारआणि तंत्रज्ञांनी प्रियाचे कौतुक केले आणि तिच्या पाककलेसाठी तिला शुभेच्छा दिल्या.
आपल्या ह्या अचानक कुकिंग सेशनबद्दल प्रिया म्हणाली, “‘वसुधा’च्या सेटवर आमचा मोठा परिवार आहे. सगळेच दररोज सेटवर छान चैतन्य आणतात. मला सगळ्यांसाठी काहीतरी मजेदार आणि वेगळे असे करावेसे वाटले. तेव्हा जेवणाच्या वेळेस सगळ्यांसाठी प्रेमाने गरमागरम चपात्या बनवण्यापेक्षा आणखी छान काय असू शकले असते? मी टीमच्या मदतीने 100 हून अधिक चपात्या बनवल्या आणि खरंच ते लक्षातही आले नाही कारण मला खूपच मजा येत होती. मी तर ते प्रेमानेच केले पण त्यातून आम्हां सर्वांना मिळालेल्या आनंदामुळे ते आणखी खास बनले.”
‘वसुधा’ ही मालिका आपल्या भावनिक कथाकथन आणि शक्तीशाली प्रदर्शनासह प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेणे कायम ठेवत असून ह्या अशा क्षणांमुळे प्रियाचे तिच्या टीमसोबत ऑफस्क्रीन नाते दृढ आणि अधोरेखित होते.