
no images were found
प्रसारमाध्यमांनी सामाजिक समता व राष्ट्रीय एकता निर्मितीसाठी कार्य करावे.:दशरथ पारेकर
कोल्हापूर (प्रतिनिधी):- सामाजिक समता व राष्ट्रीय एकता निर्मितीमध्ये प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. प्रसारमाध्यमांनी ती वृद्धिंगत होण्यासाठी प्रचार व प्रसाराचे कार्य केले पाहिजे. भारतीयांनी संविधानातील धर्मनिरपेक्षता मूल्याची जोपासना केली पाहिजे त्याचा विसर पडता कामा नये. कोणतीही धर्मांधता व जातीयवाद हा सामाजिक समता व राष्ट्रीय एकतेसाठी घातक आहेत. असे प्रतिपादन जेष्ठ पत्रकार डॉ. दशरथ पारेकर यांनी केले. ते शिवाजी विद्यापीठाच्या सामाजिक समावेशन अभ्यास केंद्राच्यावतीने कै. कासुबाई यलबाजी ममता तुकाराम मंगल स्मृती व्याख्यानमालेत ‘सामाजिक समता व राष्ट्रीय एकता’ या विषयावर बोलत होते. यावेळी कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के हे अध्यक्षस्थानी होते. प्रा. डॉ. श्रीकृष्ण महाजन यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ शिर्के म्हणाले, सामाजिक समता व राष्ट्रीय एकता ही दोन उद्दात अशी मानवी मूल्ये आहेत. राजर्षी शाहू महाराजांनी ही मूल्ये देशात रुजविण्यासाठी मोलाचे कार्य केले. शिक्षण व्यवस्थेने ही मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी अधिक प्रयत्न करणे आवश्यक आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश भाले यांनी केले तर डॉ. किशोर खिलारे यांनी आभार मानले. यावेळी श्री. बी. के. मंगल, पुष्पलता मंगल, कमल मंगल, डॉ. एम. के. भानारकर, ॲड. अभिषेक मिठारी, डॉ. तेजपाल मोहरेकर, कृष्णा भारतीय, दत्तात्रय घुटूकडे, विविध अधिविभागातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते इत्यादी उपस्थित होते.