
no images were found
आ.आशिष शेलार, सचिन पिळगांवकर , जॉनी लिव्हर, भरत जाधव आणि अनेक कलाकारांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत रंगली ‘अशी ही जमवा जमवी’ ची स्टार-स्टडेड संध्याकाळ!
कौटुंबिक मूल्यं, नातेसंबंधांची गुंफण आणि हलक्याफुलक्या विनोदांनी परिपूर्ण असा ‘अशी ही जमवा जमवी’ हा मराठी चित्रपट नुकताच प्रेक्षकांच्या भेटीला आला आणि चित्रपटाला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला. सहज संवाद, दिलखुलास अभिनय आणि भावनिक कथानक यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटाचे विशेष कौतुक केले आहे.
नुकतेच ‘अशी ही जमवा जमवी’ या सिनेमाचे मुंबईत विशेष स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते याला अनेक मराठी आणि हिंदी सेलिब्रिटींनी हजेरी लावली. इतकच नव्हे तर या विशेष स्क्रीनिंगला राज्याचे माहिती व तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री आ. आशिष शेलार यांनी सुद्धा उपस्थिती लावली आणि चित्रपटाच्या टीमशी मनमोकळा संवाद साधला. तसेच ज्येष्ठ चित्रपट निर्माता व मुंबई चित्रपट महोत्सवाचे अध्यक्ष किरण शांताराम आणि अनेक मान्यवर कलाकारांनी हजेरी लावून चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.
ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, वंदना गुप्ते तसेच प्रसिद्ध विनोदवीर जॉनी लिव्हर, सचिन पिळगांवकर , भरत जाधव, सुनील बर्वे, चैत्राली गुप्ते, ओमकार कुलकर्णी, तनिष्का विशे, संगीतकार अमितराज यांच्यासह अनेक कलाकारांनी खास हजेरी लावली. सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे संपूर्ण वातावरणात उत्साह आणि जल्लोष होता.
“अशा ही जमवा जमवी” हा चित्रपट राजकमल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला असून, व्ही. शांताराम यांचे नातू राहुल शांताराम यांचे हे पहिले निर्मिती आहे. राजकमल एंटरटेनमेंट प्रस्तुत, लोकेश गुप्ते दिग्दर्शित “अशी ही जमवा जमवी” या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनात एक चांगली छाप सोडली आहे.