Home कौटुंबिक नवरात्री सण सुरू होण्‍यापूर्वी आकर्षक मंगळसूत्र आणि पेंडण्‍ट सेट्सचे अनावरण

नवरात्री सण सुरू होण्‍यापूर्वी आकर्षक मंगळसूत्र आणि पेंडण्‍ट सेट्सचे अनावरण

2 min read
0
0
22

no images were found

 

 नवरात्री सण सुरू होण्‍यापूर्वी आकर्षक मंगळसूत्र आणि पेंडण्‍ट सेट्सचे अनावरण

 

सणासुदीचा काळ सुरू होण्‍यासह नवरात्री व दसरा सण जवळच आले असताना ओरा फाइन ज्‍वेलरने आपल्‍या नवीन फेस्टिव्‍ह कलेक्‍शन्‍सचे अनावरण केले आहे, ज्‍यामध्‍ये अप्रतिम हिरेजडित मंगळसूत्रांचा समावेश आहे, ज्‍यामधून या उत्‍साहपूर्ण सणांची मोहकता व परंपरा दिसून येते. ग्राहकांची त्‍यांच्‍या ट्रेण्‍डी फेस्टिव्‍ह लुकमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर करण्‍याची इच्‍छा असताना ओराने हिऱ्यांचे पेंडण्‍ट सेट्स आणले आहेत, जे कलेतील मोहकता आणि पारंपारिक डिझाइनला सादर करतील. ज्‍यामुळे त्‍यांच्‍या लुकमध्‍ये अधिक आकर्षकतेची भर होण्‍यासोबत उत्‍सवी आनंदामध्‍ये अधिक उत्‍साहाची भर देखील होईल. आकर्षक हिऱ्यांच्‍या डिझाइन्‍सपासून लक्ष वेधून घेणाऱ्या दागिन्‍यांपर्यंत ओराने आधुनिक काळातील महिलांच्‍या गरजा लक्षात घेत प्रत्‍येक दागिना डिझाइन केला आहे.

ओरा नवीन कलेक्‍शन अप्रतिम मंगळसूत्र देखील सादर करत आहे, ज्‍यामध्‍ये आधुनिक लक्‍झरी व कलेतील परंपरेचे उत्तम संयोजन आहे आणि बारकाईने तयार करण्‍यात आलेली प्रत्‍येक डिझाइन या उत्‍सवी साजरीकरणादरम्‍यान महिलांना परिधान करण्‍यासाठी परिपूर्ण आहे. चमकणारे हिरे व सुंदर सुवर्णकामासह सजलेले, तसेच आकर्षकता व संस्‍कृतीचे परिपूर्ण संतुलन असलेले नवीन मंगळसूत्र कलेक्‍शन यंदाच्‍या सीझनमधील उत्‍सवी लुकला अधिक लक्षवेधक करेल. याला पूरक असे आकर्षक हिऱ्याचे पेंडण्‍ट्स आहेत. नाजूक कलाकृती व आकर्षक हिऱ्यांसाठी ओळखले जाणारे हे पेंडण्‍ट्स त्‍यांच्‍या किमान, पण लक्षवेधक ग्‍लॅमरसह कोणत्‍याही लुकला अधिक आकर्षक करतील. प्रत्‍येक पेंडण्‍टमधून नवरात्री व दसरा सण साजरीकरणासाठी अधिक आकर्षकतेची खात्री मिळेल.

अधिक उत्‍साहाची बाब म्‍हणजे यंदा सणासुदीच्‍या काळात ओरा बहुमूल्‍य ग्राहकांना विशेषत: उत्‍सवी सीझनसाठी बनवण्‍यात आलेली डिझाइनर सेट्सची विशेष श्रेणी, तसेच अभूतपूर्व स्‍पेशल ऑफर्सचा आनंद घेत स्‍टाइलमध्‍ये सण साजरा करण्‍याचे आवाहन करत आहे. विशेष ऑफर्सचा लाभ घेण्‍यासाठी जवळच्‍या ओरा फाइन ज्‍वेलरी स्‍टोअरला भेट द्या. विशेष ऑफर्स पुढीलप्रमाणे:

▪ हिऱ्यांच्‍या दागिन्‍यांवर जवळपास २५ टक्‍के सूट

▪ सोन्‍याच्‍या दागिन्‍यांच्‍या घडणावळीवर २५ टक्‍के सूट

▪ ० टक्‍के व्‍याजासह ईएमआय

▪ जुन्‍या सोन्‍याच्‍या दागिन्‍यांवर ० टक्‍के कपात

*अटी व शर्ती लागू

ही मर्यादित कालावधीची ऑफर सध्‍या फक्‍त नवरात्री आणि दसरा सणादरम्‍यान उपलब्‍ध आहे.

तर मग, तुम्‍ही तुमच्‍या कलेक्‍शनमध्‍ये अधिक आभूषणांची भर करत असाल किंवा प्रियजनांसाठी परिपूर्ण गिफ्टचा शोध घेत असाल तर नवरात्रीपासून ओरामधून आवडत्‍या दागिन्‍यांची खरेदी करा आणि ट्रेण्‍डसेटिंग लुक मिळवा.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In कौटुंबिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत आहे रौप्‍यमहोत्‍सवी वर्ष 

स्‍कोडा ऑटो आतापर्यंतच्‍या सर्वोच्‍च मासिक विक्रीसह भारतात साजरे करत …