
no images were found
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने ध्वजारोहण
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमात आपल्या महानगरपालिकेची निवड झालेली आहे. त्यानिमित्त सर्व विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानते. हि निवड सर्व विभागांच्या कामगिरीवर झाली आहे. आपल्या सर्वांच्या परिश्रमामुळे शहरातील नागरीकांना वेगवेगळया विभागामार्फत चांगल्या सेवा, सुविधा देऊ शकलो. पुन्हा एकदा कामगार दिनाच्या सर्वांना शुभेच्छा त्यांनी दिल्या.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता रमेश कांबळे, सुरेश पाटील, अरुण गुजर, कामगार अधिकारी राम काटकर, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, विधी अधिकारी संदीप तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, प्रा.फंड अधिक्षक मकरंद जोशी, कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, मुख्याध्यापक, अग्निशमन दलाचे जवान, व्यायामशाळा प्रशिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.