
no images were found
सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक प्रदान
कोल्हापूर (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 65 व्या वर्धापन दिनानिमित्त दिनांक 30 एप्रिल 2025 रोजी महापालिकेच्या सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या 7 कर्मचाऱ्यांना प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व प्रा.फंडाच्या रक्कमेचा चेक आज देण्यात आला. महापालिकेच्या प्रा.फंड विभागाच्यावतीने हा कार्यक्रम घेण्यात आला.
प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी यावेळी बोलताना महापालिकेच्या सेवा निवृत्त झालेले कर्मचाऱ्यांनी गेले 28 वर्षे महापालिकेस सेवा दिली आहे. कर्मचारी जेवढा वेळ कुटुंबासोबत घालवत नसतो तेवढा वेळ महापालिकेस देत असतो. आजपासून प्रत्येक महिन्यात सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना तात्काळ प्रा.फंडाची रक्कम मिळाली जाईल त्याबाबतचे तसे आदेश संबंधीत विभागाला प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी दिले.
यावेळी अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, उपायुक्त पंडीत पाटील, कपिल जगताप, सहाय्यक आयुक्त उज्वला शिंदे, संजय सरनाईक, स्वाती दुधाणे, मुख्य लेखापरिक्षक कलावती मिसाळ, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जल अभियंता हर्षजीत घाटगे, नगरसचिव सुनिल बिद्रे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता रमेश कांबळे, सुरेश पाटील, अरुण गुजर, कामगार अधिकारी राम काटकर, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, रवका अधिकारी प्रशांत पंडत, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, विधी अधिकारी संदीप तायडे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, प्रा.फंड अधिक्षक मकरंद जोशी, कर्मचारी संघाचे मुख्य संघटक संजय भोसले, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलचे विद्यार्थी, विद्यार्थींनी, मुख्याध्यापक, अग्निशमन दलाचे जवान, व्यायामशाळा प्रशिक्षक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.