no images were found
महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
कोल्हापूर :- महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या वसुली विभागात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या महापालिकेच्या अधिकारी व कर्मऱ्यांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. हा कार्यक्रम महापालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात घेण्यात आला.
यामध्ये घरफाळा, पाणी पुरवठा, संगणक विभाग, नगररचना, प्रधानमंत्री आवास योजना, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियाना या विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 63 व्या वर्धापन दिनानिमित्त महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व कर्मचारी संघाचे अध्यक्ष संजय भोसले यांच्या हस्ते कर्मचाऱ्यांना खाकी कापड, पांढरे कापड व महिला कर्मचाऱ्यांना साडया देण्यात आल्या.
अग्निशमन विभागाकडील कर्मचाऱ्यांनी दिनांक 5 एप्रिल 2023 रोजी जोतिबा यात्रे दिवशी पंचगंगा नदीमध्ये पाण्यात बुडणाऱ्या भाविकास वाचवले बद्दल वाहन चालक सुशांत पोवार, तांडेल सर्जेराव लोहार, फायरमन निलेश शिनगाडे व अमित शिनगाडे यांचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, शहर अभियंता हर्षजीत घाटगे, जल अभियंता नेत्रदिप सरनोबत, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, उपशहर अभियंता एन.एस.पाटील, नारायण भोसले, कामगार अधिकारी तेजश्री शिंदे, रवका अधिकारी प्रशांत पंडत, परवाना अधिक्षक राम काटकर, नगरसचिव सुनिल बिद्रे, करनिर्धारक व संग्राहक सुधाकर चल्लावाड, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ.विजय पाटील, राजमाता जिजामाता गर्ल्स हायस्कुलच्या मुख्याध्यापीका सौ.अंजली जाधव, अग्निशमन दलाचे जवान, व्यायामशाळा प्रशिक्षक, अधिकारी, कर्मचारी, उपस्थित होते.