
no images were found
एका महत्त्वपूर्ण दृश्यासाठी सिमरन कौरने ऑटोरिक्षा चालवायला शिकली
झी टीव्हीवरील लोकप्रिय मालिका ‘जमाई नं.1’ मधील एका महत्त्वाच्या भागासाठी प्रेक्षकांना भावनांनी भरलेली दृश्ये पाहायला मिळणार आहेत, कारण रिद्धीच्या भूमिकेतील सिमरन कौर एका हिरॉईक ॲक्टमध्ये दिसून येईल आणि तिला पाहून प्रेक्षक थक्क होतील. नाट्यमय घडामोडींमध्ये रिद्धी जीवनमरणाच्या प्रसंगात सापडेल कारण तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका येईल. आजूबाजूला मदत करायला कोणीच नसताना तिला अचानक जवळ एक ऑटोरिक्षा दिसते आणि मग ती क्षणात तिच्या ड्रायव्हरच्या सीटवर बसते आणि त्यांना इस्पितळात घेऊन जाते. यातून तिचे तिच्या परिवारावरील अढळ प्रेम, तिची ताकद आणि निर्धार दिसून येतो.
हे दृश्य साकारण्याचा अनुभव सिमरनसाठी विशेष आणि आव्हानात्मक होता. पण खरेपणासाठी आपल्या निर्धारासाठी ती मानली जाते आणि कुठल्याही बॉडी डबलच्या वापराशिवाय हे दृश्य स्वतः करण्याचे तिने ठरवले. ह्याआधी तिने कधी ऑटोरिक्षा चालवली नव्हती, तरीही तिने हे आव्हान स्वीकारले. प्रॉडक्शन टीमच्या मदतीने तिने पटकन बेसिक गोष्टी शिकल्या आणि मोठ्या तणावाखाली यशस्वीपणे हे दृश्य साकारले.
आपल्या अनुभवाबद्दल सिमरन म्हणाली, “मी सेटवर केलेल्या अगदी वेगळ्या गोष्टींपैकी ही एक आहे. मी ह्याआधी कधीही ऑटो चालवली नव्हती, त्यामुळे हे माझ्यासाठी अगदी नवीन होते. मी टेकच्या अगदी एक तास आधी ऑटोरिक्षा चालवायला शिकवली आणि अर्थात त्यामुळे अख्ख्या दृश्याला एक प्रकारचा खरेपणा लाभला. हे दृश्य साकारताना मी अतिशय रोमांचित होते. आम्ही योग्य त्या सुरक्षा उपाययोजना केल्या होत्या. टीमने मला छान पाठिंबा दिला. त्यांनी सहनशक्ती राखली आणि पूर्णपणे मला समर्थन दिले. असे काहीतरी ‘आऊट ऑफ दि बॉक्स’ करणे ताजतवाने करणारे होते आणि माझ्या व्यक्तिरेखेची ही बाजू सर्वांनी पाहावी यासाठी मी खरंच खूप उत्सुक आहे.”
ह्या दृश्याच्या माध्यमातून आपल्याला अगदी नवीन काहीतरी शिकायला मिळाले याबद्दल सिमरन अतिशय उत्साहात असून खरे नाट्य तर आता सुरूच होत आहे. जसजसे हे नाट्य उलगडत जाईल, तसतसे प्रेक्षकांना नील अभिषेक मलिक आणि रिद्धी यांच्या आयुष्यात भावनांचा कल्लोळ, नवनवीन गोष्टींचा उलगडा आणि नाट्यमय वळणे पाहायला मिळतील.