
no images were found
टोयोटा किर्लोस्कर मोटरने टोयोटा रुमियनचा नवीन ग्रेड सादर केला
बंगलोर – टोयोटा किर्लोस्कर मोटर (टीकेएम) ने आज अधिकृतपणे ई-सीएनजी बुकिंग पुन्हा सुरू झाल्याची घोषणा केली तसेच टोयोटा रुमियन च्या नवीन ग्रेड जी-एटी ची बुकिंग आणि किंमत जाहीर केली. नव्याने लाँच केलेल्या जी-एटी व्हेरियंटमुळे रुमियन ची अतुलनीय जागा आणि आराम, उत्कृष्ट इंधन कार्यक्षमता, स्टायलिश आणि प्रिमियम एक्सटेरिअर डिझाईनसह बाजारपेठेतील उपस्थिती आणखी वाढेल अशी अपेक्षा आहे.
टीकेएम ची लेटेस्ट ऑफर 13,00,000 रुपयांच्या आकर्षक एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध असेल आणि 5 मे पासून डिलिव्हरी सुरू होण्याची अपेक्षा आहे. ग्राहक कोणत्याही अधिकृत डीलरशिपवर किंवा ऑनलाइन 11,000/- च्या बुकिंग फीसह वाहन बुक करू शकतात.
टोयोटा रुमियन जी-एटी व्हेरियंटमध्ये 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह, 1.5-लिटर के सीरीज पेट्रोल इंजिन आहे, ज्यामध्ये निओ ड्राइव्ह (आयएसजी) तंत्रज्ञान आहे जे उत्कृष्ट परफॉर्मन्स देते. जिथे पेट्रोल ग्रेडचे पॉवर आउटपुट 6000 आरपीएम वर 75.8 किलोवॅट आणि 4400 आरपीएम वर 136.8 एनएम टॉर्क आहे, तर सीएनजी ग्रेडचे आउटपुट 5500 आरपीएम वर 64.6 किलोवॅट आउटपुट आणि टॉर्क 121.5 एनएम @ 4200 आरपीएम पर्यंत वाढतो. टोयोटा रुमियन आता निओ ड्राइव्ह एमटी: एस, जी आणि व्ही ग्रेड, निओ ड्राइव्ह एटी: एस, जी आणि व्ही ग्रेड, ई-सीएनजी: एस ग्रेडच्या सात व्हेरियंटमध्ये उपलब्ध आहे. ज्यात ग्राहकांसाठी विविध पर्याय उपलब्ध आहे.
जी-एटी व्हेरियंट, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कारप्लेसह, 17.78 सेमी स्मार्टप्ले कास्ट टचस्क्रीन ऑडिओ सिस्टमसह प्रगत तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. आय-कनेक्टसह सुसज्ज असलेले टोयोटा, हे हवामान, लॉक/अनलॉक, हजार्ड लाईट्स आणि अनेक कनेक्ट केलेल्या फीचर्ससाठी रिमोट कंट्रोल्स ऑफर करते. टोयोटा रुमियन आपल्या मालकांसाठी ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडी सह एबीएस, हिल होल्ड, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम (ईएसपी) यासारख्या अॅडव्हान्स सेफ्टी फीचर्ससह सुरक्षिततेला प्राधान्य देते.
श्री सबरी मनोहर – वाईस प्रेसिडेंट, सेल्स आणि स्ट्रॅटेजिक मार्केटिंग, टोयोटा किर्लोस्कर मोटर, घोषणा करताना म्हणाले, “आम्ही टोयोटा रुमियन लाइनअपमध्ये नवीन ग्रेड समाविष्ट केल्याची घोषणा करताना आनंदी आहोत ज्यामुळे ग्राहकांना त्यांच्या वाढत्या गरजा आणि आवश्यकतांनुसार विस्तृत आणि अधिक पर्याय मिळतात. जी-एटी व्हेरियंटसाठी बुकिंग आता उघडले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये लॉन्च झाल्यापासून, टोयोटा रुमियनने ग्राहकांमध्ये खूप उत्साह निर्माण केला आहे, ज्यामुळे खरेदीसाठी स्ट्रॉंग इन्क्वायरी आणि चांगली बुकिंग झाली आहे. आमच्या मूल्यवान ग्राहकांनी दाखवलेल्या प्रेमाची आणि विश्वासाची आम्ही मनापासून प्रशंसा करतो.
टोयोटाच्या ग्राहक केंद्रित दृष्टिकोनाच्या अनुषंगाने, आम्ही नियमित अंतराने नवीन उत्पादने आणि व्हेरियंट्स सादर करून ग्राहकांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्याकडे आमचे लक्ष केंद्रित करत आहोत आणि त्यांना अधिक चांगल्या कार उपलब्ध करून देण्यावर भर देत आहोत. आमचा विश्वास आहे की टोयोटाच्या अतुलनीय जागा, अॅडव्हान्स फीचर्स आणि उत्कृष्ट परफॉर्मन्ससह, मूल्यवर्धित प्रस्तावाद्वारे आणि उत्कृष्ट विक्रीनंतरच्या सेवेसह, टोयोटा रुमियनची प्रत्येक ड्राईव्ह आराम, आनंद आणि मन:शांती यांनी भरलेली आहे याची खात्री करून, टोयोटा रुमियन खरेदी करण्याची इच्छा असलेल्या कुटुंबासाठी एक पसंतीचा पर्याय बनेल.”
टोयोटा एमपीव्ही सिग्नेचर फ्रंट ग्रिल, क्रोम फिनिशसह फ्रंट बंपर, बॅक डोअर क्रोम गार्निशसह एलईडी टेल लॅम्प आणि मशीन केलेले दोन टोन अॅलॉय व्हील यासारख्या मजबूत फीचर्ससह, रुमियनने स्टायलिश आणि प्रिमियम एक्सटीरियर डिझाइन आणले आहे. आलिशान इंटीरियरमध्ये वुडन फिनिश डॅशबोर्ड आणि डोअर ट्रिम्ससह प्रीमियम ड्युअल-टोन, प्रीमियम ड्युअल-टोन इंटिरियर्स आणि सोयीस्कर फीचर्स आहे.
टोयोटा रुमियन देखील सर्वोच्च सुरक्षा मानकांचे पालन करते. यात ड्युअल फ्रंट एअरबॅग्ज, ईबीडी सह एबीएस आणि ब्रेक असिस्ट, इंजिन इमोबिलायझर, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट आणि आयएसओ फिक्स चाइल्ड सीट अँकरेज जे सुरक्षितता अधिक वाढवतात. त्याच्या फीचर्समध्ये प्रीटेन्शनर्स आणि फोर्स लिमिटर्ससह फ्रंट सीट बेल्ट, सर्व सीटसाठी सीट बेल्ट रिमाइंडर आणि हाय-स्पीड अलर्ट सिस्टम यांचा समावेश आहे.
टोयोटा रुमियन हे टोयोटा सेवा ऑफर करण्याच्या वारशाने परिपूर्ण आहे, ज्यामध्ये ग्राहकांच्या मालकीचा अनुभव वाढवण्यासाठी अनेक कस्टमाइज्ड फायनान्स स्कीम्स आणि अतुलनीय मूल्यवर्धने आहेत. या ऑफरमध्ये टोयोटाच्या अस्सल अॅक्सेसरीजसाठी विस्तारित वॉरंटी आणि आर्थिक पर्याय यासारख्या मूल्यवर्धित सेवांचा समावेश आहे, जे ग्राहकांसाठी फायदेशीर असणारी परवडणारी क्षमता आणि लवचिकता यावर लक्ष केंद्रित करतात. इतर पर्यायांमध्ये 8 वर्षांपर्यंतच्या वित्त योजना, वाढीव परवडणारी कमी ईएमआय, मूल्यवर्धित सेवांसाठी पूर्व-मंजूर निधी आणि खरेदीला समर्थन देण्यासाठी टोयोटा स्मार्ट फायनान्स [बलून फायनान्स] आणि ग्राहकांना विविध पर्याय उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे.
इतर मूल्य लाभ सेवांमध्ये टोयोटाने नव्याने सादर केलेली 5 वर्षांची मोफत रोडसाइड असिस्टंस, 3 वर्षांची /1,00,000 किमीची मानक वॉरंटी समाविष्ट आहे, जी नाममात्र किमतीत 5 वर्षे/2,20,000 किमी पर्यंत वाढवता येते.
याव्यतिरिक्त, कंपनीने अलीकडेच उद्योगातील पहिले “अप्रतिम न्यू कार डिलिव्हरी सोल्यूशन” देखील लाँच केले आहे जे डीलर कर्मचाऱ्यांकडून डिलिव्हरी स्थानापर्यंत नवीन कारची संभाव्य ड्राईव्ह काढून टाकून डिलिव्हरी टचपॉइंटपर्यंत वाहन लॉजिस्टिक सेवांचा विस्तार करते. उद्योगात प्रथमच, नवीन उपक्रम टोयोटा डीलर्सना नवीन वाहने डीलर स्टॉकयार्ड्सपासून त्यांच्या विक्री केंद्रांवर फ्लॅट-बेड ट्रकवर नेण्यास सक्षम करेल.