Home Uncategorized मतदान वाढीसाठी जनजागृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे – अमोल येडगे

मतदान वाढीसाठी जनजागृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे – अमोल येडगे

15 second read
0
0
27

no images were found

मतदान वाढीसाठी जनजागृती कार्यक्रमातून विद्यार्थ्यांचे योगदान महत्त्वाचे – अमोल येडगे

 

कोल्हापूर  : सार्वत्रिक लोकसभा निवडणूक 2024 निवडणुकीसाठी मतदान जागृती (SVEEP) अंतर्गत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याअनुषंगाने मतदारांचा जास्तीत जास्त सहभाग वाढावा यासाठी मतदार जनजागृतीसाठी कोल्हापूर शहरातील शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सहभागाने भव्य मानवी रांगोळी 19 मार्च 2024 रोजी महात्मा गांधी मैदान, कोल्हापूर येथे साकारण्यात आली. या उपक्रमाची “नोंद एशियन पॅसिफिक बुक रेकॉर्ड” व “नॅशनल बुक रेकॉर्ड” मध्ये झालेली आहे. तसेच जिल्हयातील  2 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी पालकांना मतदान करण्याचे आवाहन पत्र लिहून केले. या अभूतपूर्व यशाकरीता जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते सहभागी शाळा मुख्याध्यापक, विद्यार्थी, सहकार्य केलेले कला शिक्षक आणि क्रीडा शिक्षक यांचा सत्कार सोहळा आज राम गणेश गडकरी हॉल, पेटाळा येथे संपन्न झाला. कार्यक्रमास अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, सहाय्यक नोडल ऑफीसर (SVEEP) तथा सहकारी संस्थेचे जिल्हा उप निबंधक निलकंठ करे, शिक्षणाधिकारी जि.प. (माध्यमिक) एकनाथ अंबोकर, प्रशासनाधिकारी शंकर यादव, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे उपस्थित होते.

        सहाय्यक नोडल ऑफीसर (SVEEP) श्री. करे यांनी प्रास्ताविक मध्ये मानवी रांगोळी संकल्पना, विद्यार्थी सहभाग, शाळांनी केलेले सहकार्य आणि मतदान जागृती (SVEEP) अंतर्गत राबविण्यात आलेले विविध उपक्रमांबाबतची माहिती देऊन कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करण्याबाबत मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. येडगे यांनी भव्य मानवी रांगोळी संकल्पना पूर्णत्वास आणणारे आणि या उपक्रमास सहकार्य केलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. कोल्हापूरमध्ये मतदारांनी मतदानाचा १०० टक्के हक्क बजावून मतदानाची जास्तीत जास्त टक्केवारी प्रस्तावित करण्याबाबत आवाहन केले. संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन वर्षा परीट, सहाय्यक नोडल अधिकारी (SVEEP) तथा वरिष्ठ लेखा परीक्षक, कोल्हापूर महानगरपालिका, सुनील धायगुडे सहाय्यक निबंधक, सह संस्था, मिलिंद ओतारी कार्यालय अधीक्षक, नितीन माने सहकारी अधिकारी, उदय उलपे कार्यालय अधीक्षक, सचिन पांडव क्रीडा निरीक्षक कोल्हापूर महानगरपालिका यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शितल हिरेमठ आणि रावसाहेब किर्तीकर यांनी तर आभार वर्षा परीट यांनी मानले. उपस्थित सर्व विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांनी ‘वोट फॉर कोल्हापूर’ची घोषवाक्य  उच्चारुन कार्यक्रमाची सांगता झाली. सौ. स.म.लोहिया हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, न्यू हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश मिडीयम स्कूल शाळेतील विद्यार्थ्यांना प्राथमिक स्वरुपात प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 जिल्ह्यात शंभर टक्के मतदान होण्यासाठी मतदारांना आवाहन  जनजागृती कार्यक्रमातून चांगल्या प्रकारे सर्व मतदारांपर्यंत संदेश दिला गेला. राज्य व देश पातळीवर कोल्हापूरची मतदान टक्केवारीत ओळख निर्माण होईल असे मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले. कोल्हापूरची परंपरा 70 टक्क्यांपेक्षा नेहमीच जास्त असते. ही परंपरा अधिक वाढवून आपणाला नवी ओळख निर्माण करायची आहे. देशाची लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी आपणाला मतदारांचा प्रत्यक्ष सहभाग वाढवावा लागेल,  असेही ते यावेळी म्हणाले.

 सत्कार प्राप्त शाळा मुख्याध्यापक पुढीलप्रमाणे : दादासाहेब अ.मगदूम हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, इंदिरा गांधी विद्यानिकेतन, आर्यव्रीन ख्रिश्चन हायस्कूल, जवाहरनगर हायस्कूल, कोल्हापूर इंग्लिश स्कूल, कोल्हापूर हायस्कूल, मलग हायस्कूल, महाराणा प्रताप हायस्कूल, महाराष्ट्र हायस्कूल, मनपा नेहरूनगर विद्यालय, मनपा संत रोहिदास विद्यामंदिर, मनपा वीर कक्कय विद्यामंदिर, नागोजीराव पाटणकर हायस्कूल, न्यू हायस्कूल, प्रिन्सेस इंदुमातीदेवी हायस्कूल, प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूल, प्रायव्हेट इंग्लिश स्कूल, प्रायव्हेट हायस्कूल, राजर्षी शाहू महाराज मिडीयम स्कूल, नूतन मराठी विद्यालय हायस्कूल, शिवाजी मराठा हायस्कूल, नूतन मराठी ब्रँच क्र. 1, श्री साई हायस्कूल ज्युनिअर कॉलेज, शा.कृ.पंत वालावलकर हायस्कूल, कोरगावकर हायस्कूल, संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल, रंकाळा, सेंट झेविअर्स हायस्कूल, चाटे माध्यमिक स्कूल, कोल्हापूर पब्लिक स्कूल, जिनरत्नेय पब्लिक स्कूल, संजीवन इंग्लिश मिडीयम स्कूल, कदमवाडी हायस्कूल जुना बुधवार, सौ स.म.लोहिया हायस्कूल, शाहू दयानंद हायस्कूल, विद्यापीठ हायस्कूल, विमला गोयंका इंग्लिश स्कूल

सत्कार प्राप्त अधिकारी/कला शिक्षक/क्रीडा शिक्षक/सहा. शिक्षक पुढीलप्रमाणे : श्री. एकनाथ अंबोकर, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), श्री. शंकर केशव यादव प्रशासनाधिकारी प्राथमिक शिक्षण समिती, कोमनपा, श्री. दिगंबर मोरे उपशिक्षणाधिकारी जिल्हा परिषद, कोल्हापूर, श्री. सचिन पांडव, शारीरिक शिक्षण निरीक्षक प्राथमिक शिक्षण समिती, कोमनपा, श्री. राजेंद्र बनसोडे क्रीडा शिक्षक शा.कृ.पंत वालावलकर हायस्कूल, श्री. नागेश हंकारे कला शिक्षक कोरगावकर हायस्कूल, श्री. सदाशिव राठवळ क्रीडा शिक्षक कोरगांवकर हायस्कूल, श्री. विनायक भिउंगडे क्रीडा शिक्षक राजर्षी शाहू हायस्कूल रिंगरोड, श्री. शैलेश कांबळे कला शिक्षक सृजन आनंद विद्यालय, श्री. रावसाहेब शिंदे कला शिक्षक न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल, श्री. शीतल होगाडे कला शिक्षक शिरोली हायस्कूल, श्री. रमजान मुल्ला कला शिक्षक नेहरु हायस्कूल, श्री. जितेंद्र कुबडे कला शिक्षक आर्यव्रीन ख्रिश्चन हायस्कूल, श्री. विश्वास माळी कला शिक्षक शा.कृ.पंत वालावलकर हायस्कूल, श्री. मानसिंग पाटील कला शिक्षक भारती विद्यापीठ इंग्लिश स्कूल, श्री. संजय वाडकर कला शिक्षक प्रिन्सेस पद्मारराजे गर्ल्स हायस्कूल, श्री. रितेश माने कला शिक्षक डॉ. व्ही.जे.पाटील स्कूल, श्री. किशोर पाटील कला शिक्षक वाय. पी. पोवार विद्यालय, श्री. अनिल अहिरे कला शिक्षक सौ. स.म.लोहिया हायस्कूल, श्री. गजानन धुमाळे सहा.शिक्षकमहाराष्ट्र हायस्कूल, श्री. व्ही.आर. खराटे सहा. शिक्षक प्रायव्हेट हायस्कूल, श्री. रमण लोहार कला शिक्षक साधना हायस्कूल, श्री. दिगंबर गवळी कला शिक्षक वि. स. खांडेकर प्रशाला, श्री. पद्माकर कुलकर्णी कला शिक्षक वि. म. लोहिया मुकबधीर स्कूल, श्री रावसाहेब गणपती किर्तीकर प्र. मुख्याध्यापक, म्यु. एस्तर पॅटर्न स्कूल, सौ. शितल विवेकानंद हिरेमठ सहा. शिक्षिका तवनाप्पा पाटणे हायस्कूल.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In Uncategorized

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…