
no images were found
शिवाजी विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती
कोल्हापूर – राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती आज शिवाजी विद्यापीठात साजरी करण्यात आली.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य प्रशासकीय भवनामध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेस आज प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद पाटील आणि कुलसचिव डॉ.विलास शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन अभिवादन करण्यात आले. यावेळी, मानव्यशास्त्र विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ.महादेव देशमुख, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.प्रकाश गायकवाड, हिंदी अधिविभागप्रमुख डॉ.औदुंबर सरवदे, डॉ.चंदा सोनकर, डॉ.विजय सदामते, डॉ.मच्छींद्र गोफणे, प्रकाश निकम, प्रकाश मंजु, हेमंत जाधव, आसावरी भालेराव, मयुरी दांडगे यांचेसह प्रशासकीय अधिकारी, सेवक, विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.