no images were found
७/१२, नकाशे ऑनलाईन सुविधा नागरिकांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात : राहूल चिकोडे
कोल्हापूर : देशाचे पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांनी डिजिटलायझेशनच्या माध्यमातून संपूर्ण देशभरात विविध गोष्टींसाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सर्व शासकीय कार्यालयातील व्यवहार आता ऑनलाईन पद्धतीने सुरू झाले आहे. परंतु कोल्हापूर मधील अनेक ठिकाणी अशा सुविधा अद्यापही सुरु झालेल्या नाहीत. कार्यालयांच्या या तांत्रिक अडचणीमुळे नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. याविषयात आज भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी जिल्हा भूमी अधीक्षक सुदाम जाधव यांची यांच्याकडे निवेदन सादर केले.
आपल्या क्षेत्रातील गट नकाशे अजूनही अपलोड झालेले नाहीत या सर्व प्रक्रियेमध्ये करवीर तालुका ऑनलाईन पद्धतीत सर्वात मागे आहे. गट नंबर सातबारा असलेली ग्रामीण 409 गावे व सिटी सर्वे असलेली 507 गावे, त्याचबरोबर कोल्हापूर शहर आणि इचलकरंजी इतक्या क्षेत्रांमधील नकाशे वेबसाईटवर दिसत नाहीत. सर्वर डाऊन हे एकच उत्तर शासकीय कर्मचाऱ्याकडून दिले जात आहे. भूमी अभिलेख कार्यालयात नक्कल मागणी अर्ज नागरिकांना तात्काळ दिले जावेत, सर्व नकाशे डिजिटल सातबारा उतारा प्रमाणे मिळावा तसेच ऑनलाईन सातबारा आणि नकाशे मिळण्यासाठी आपण स्वत: याविषयात लक्ष घालून याबाबत दुरुस्ती करावी अन्यथा नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल. अशा मागणीचे निवेदन यावेळी सादर करण्यात आले.