
no images were found
बाळासाहेब थोरातांचा वाढदिवस, चर्चा इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाची
नाशिक : काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात नाशिकसह संगमनेर अहमदनगरमध्ये साजरा करण्यात आला. मात्र दुसरीकडे याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याने चांगलीच खळबळ उडाली. दरम्यान दुसरीकडे वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या इंदोरकर महाराजांच्या किर्तनाची चर्चा सध्या चांगली रंगली
इंदुरीकर महाराज या किर्तनात म्हणाले की, आजचा कार्यक्रम फक्त थोरात साहेबांवर असलेल्या श्रद्धेमुळे केला. उपस्थित सर्वांचे कौतुक, आपण सगळ्यांनी मिळून त्यांचा शंभरावा वाढदिवस सुद्धा साजरा करूयात. क्षेत्र कोणतेही असो आपला माणूस हा आपला स्वाभिमान असतो. थोरात साहेबांचे एक वाक्य नेहमीच लागू पडते, ते म्हणजे जी दगडं घाव सहन करतात. तीच दगडं मूर्ती बनवण्यासाठी वापरण्यात येतात. अन् ज्यांच्यामध्ये घाव सहन करण्याची ताकद आहे, त्यांना यश निश्चित मिळत असल्याचे इंदुरीकर म्हणाले.