Home सामाजिक या उन्हाळ्यात फ्रिझ्झी केसांची चिंता सतावते आहे का? मऊ आणि पोषणयुक्त केसांसाठी DIY हेअर मास्क वापरून पहा

या उन्हाळ्यात फ्रिझ्झी केसांची चिंता सतावते आहे का? मऊ आणि पोषणयुक्त केसांसाठी DIY हेअर मास्क वापरून पहा

46 second read
0
0
31

no images were found

या उन्हाळ्यात फ्रिझ्झी केसांची चिंता सतावते आहे कामऊ आणि पोषणयुक्त केसांसाठी DIY हेअर मास्क वापरून पहा

उन्हाळा सुरू झाला की, आपल्या केसांची नियमितपणे काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे ठरते, जेणेकरून त्यांचे घातक यूव्ही किरणे, दमट हवा व प्रदूषणापासून संरक्षण व्हावे. हे तीन घटक एकत्र आले की त्याची परिणती केस निस्तेज, कोरडे आणि फ्रिझ्झी किंवा भुरभुरीत होण्यामध्ये होते. त्यातही ते जड पाण्याच्या संपर्कात आले की, त्यांची स्थिती अधिकच बिघडते व ते सहजपणे निस्तेज होतात व तुटतात.

केसांच्या भुरभुरेपणाला आटोक्यात ठेवण्याचा आणि त्यांना सखोल पोषण पुरविण्याचा एक परिणामकारक मार्ग म्हणजे केसांना नियमितपणे तेल लावण्याची सवय लावून घेणे. केशतेलांचे कितीतरी पर्याय बाजारात निवडीसाठी उपलब्ध असले तरीही त्यातून तुमच्या केसांसाठी योग्य घटकांचा समावेश असलेला पर्याय निवडण्याची गरज असते. कोरफड अर्थात अॅलो व्हेरा हा असाच एक घटक आहे, जो अनेक वर्षांपासून उन्हाळ्यासाठीचा सर्वात आवडता पर्याय राहीला आहे!

अॅलो व्‍हेरासह खोबरेल तेलापासून बनवण्‍यात आलेल्‍या हेअर ऑईलचे हे अद्वितीय मिश्रण केसांच्‍या मुळांच्‍या जवळपास १० स्‍तरांपर्यंत खोलवर जाते आणि केस फ्रिझ्झी होण्‍याला नियंत्रण करते. अॅलो व्‍हेरा केसांची वाढ होण्‍यास, केसगळतीला प्रतिबंध करण्‍यास मदत करते, ज्‍यामुळे उन्‍हाळ्यादरम्‍यान केसांचे संरक्षण होण्‍यासोबत केसांचे आरोग्‍य सुधारते. तसेच अॅलो व्‍हेरामध्‍ये व्हिटॅमिन्‍स व मिनरल्‍स संपन्‍न प्रमाणात असतात, जे टाळू व केसांचे पोषण करू शकतात, ज्‍यामुळे केस मजबूत होतात आणि केस तुटण्‍याची शक्‍यता कमी होते. तसेच, ते टाळूला शांत करण्‍यास आणि केसांमधील कोंडा कमी करण्‍यास देखील मदत करू शकते.

खास सल्‍ला: केस धुण्‍यापूर्वी केस व टाळूला तेलासह मसाज करा आणि ३० मिनिटांसाठी तसेच ठेवा. सर्वोत्तम परिणामांसाठी आठवड्यातून २-३ वेळा या तेलाचा वापर करा.  

तेव्हा या उन्हाळी मोसमात केसांची नियमित निगराणी करा आणि त्यांचा भुरभुरीतपणा नियंत्रणात ठेवण्यासाठी व मऊ, पोषणयुक्त केस मिळविण्यासाठी अॅलो व्हेरा व खोबरेल तेलाचा आधार असलेल्या केशतेलाच्या गुणकारी मिश्रणाचा अनुभव घ्या.

Load More Related Articles
Load More By Aakhada Team
Load More In सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प्रकाशीत

पीअँडजी शिक्षाचा प्रभावी दोन दशकांचा उत्सव: पीअँडजी शिक्षाचा “ट्वेंटी टेल्स ऑफ ट्रायम्फ” प…