
no images were found
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे 2024-2025 या शैक्षणिक वर्षाकरीता प्रथम वर्ष प्रवेश अर्ज करण्यासाठी मुदतवाढ…..
कोल्हापूर(प्रतिनिधी) – सन 2024-2025 या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ अधिविभाग व संलग्नित महाविद्यालयांमध्ये शिकविल्या जाणा-या M.Sc. व तत्सम अभ्यासक्रम तसेच विद्यापीठ अधिविभागांकडील एम.ए.एम.कॉम. एम.ए.(म्युझिक)ए एम. ए. वुमेन्स स्टडीज, एलएल.एम. मास्टर ऑफ रूरल स्टडीज, एम. लिब. अँड इनफॉर्मेंशन सायन्स, एम.एस्सी. (Mathematics with Computer Application), एम.सी.ए. (संगणकशास्त्र) एम.बी.ए. (डिस्टन्स मोड), बीसीए, बी.ए. स्पोर्टस, बी.ए.(फिल्म मेकिंग) , बी. कॉम. (बँकिंग ॲड फायनान्स), बी.एस्सी.-एम.एस्सी. नॅनोसायन्स अँड बायोटेक्नॉलॉजी (एकात्मिक पाच वर्षे) बी.एस्सी.- एम.एस्सी. अर्थशास्त्र (एकात्मिक पाच वर्षे) या अभ्यासक्रमांच्या भाग 1 प्रवेशाकरिता प्रवेश परीक्षेसाठी यापूर्वी दि. 25/04/2024 पर्यंत तसेच प्रवेश परिक्षेव्यतिरिक्त अभ्यासक्रमांसाठी दि.14/05/2024 अखेर अर्ज मागणी करण्यात आले होते. यास विद्यार्थी हितास्तव ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमांच्या भाग 1 प्रवेशाकरिता दि.10/05/2024 पर्यंत व ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा नाही अशा अभ्यासक्रमांना प्रवेश् अर्ज भरण्यासाठी दि.25/05/2024 अखेर मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रवेश परीक्षा असलेल्या अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा दि.16/05/2024 ते 19/05/2024 रोजी घेण्यात येणार आहे. प्रवेश परीक्षेचे ओळखपत्र (हॉल तिकीट) दि.15/05/2024 अखेर विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर उपलब्ध करण्यात येणार आहे.शिवाजी विद्यापीठात नियमित अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या सीमा भागातील विद्यार्थ्यांकरीता विशेष सवलत देण्यात येत
आहे. विद्यार्थ्यांनी सविस्तर तपशीलासाठी https://www.unishivaji.ac.in/mscadmission/For-Student-Information या संकेतस्थळाला भेट द्यावी. तसेच प्रवेशासंदर्भात अद्ययावत माहिती वेळोवेळी वरील संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल, याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.